माहिती अधिकाराने मिळाले बळ
By Admin | Updated: November 2, 2015 01:04 IST2015-11-02T01:04:45+5:302015-11-02T01:04:45+5:30
माहिती अधिकार हा कायदा शस्त्र असून, त्याचा वापर समाजासाठी व्हावा. सर्वसामान्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी या कायद्याचा अधिकाधिक वापर व्हावा.

माहिती अधिकाराने मिळाले बळ
पुणे : माहिती अधिकार हा कायदा शस्त्र असून, त्याचा वापर समाजासाठी व्हावा. सर्वसामान्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी या कायद्याचा अधिकाधिक वापर व्हावा. या कायद्यामुळे समस्या सोडविण्यास बळ मिळाले, अशा भावना माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
देशात आॅक्टोबर २००५ मध्ये माहिती अधिकार कायदा लागू झाला. त्याला १० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्त रविवारी सजग नागरिक मंचातर्फे कार्यकर्त्यांचे अनुभव कथन आणि चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या कायद्याने व्यवस्थेतील त्रुटी, भ्रष्टाचार उघडकीस आणण्यास व व्यवस्था परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवण्यास नागरिकांना सक्षम व सजग केले. दशकपूर्तीनिमित्त या कायद्याचा सुयोग्य वापर करणाऱ्या नागरिकांना येणाऱ्या बऱ्यावाईट अनुभवांचे आदान-प्रदान या निमित्ताने करण्यात आले.
शुक्राचार्य गायकवाड, सतीश चितळे, विष्णू कमलापूरकर, भगवान निवदेकर, कनिझ सुखरानी, अझर खान, गणेश बोऱ्हाडे, संजय शिरोडकर, पुष्काराज जगताप, विनोद राठी, अनुप सराफ, विनोद जैन, अमोल देशपांडे, यतिन देवडिया, जुगल राठी, विवेक वेलणकर सहभागी झाले होते.
लोकमान्य टिळक यांच्यावर चित्रपट करण्यासाठी केंद्र सरकारकडून अडीच लाख रुपये घेण्यात आले. राज्य शासनानेही ५० लाख रुपये दिले, पण हा चित्रपट पूर्ण झाला का, त्याला सेन्सॉर बोर्डाने मंजुरी दिली का, हे प्रश्न अद्याप कसे अनुत्तरीत असल्याचे कमलापूरकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)