शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सणवारात महागाईचा वाढला तडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:14 IST

अभिजित कोळपे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : श्रावण महिन्यापासून विविध सणवारांना आपल्याकडे सुरुवात होते. मात्र, नेमकी याच काळात दरवर्षी ...

अभिजित कोळपे

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : श्रावण महिन्यापासून विविध सणवारांना आपल्याकडे सुरुवात होते. मात्र, नेमकी याच काळात दरवर्षी खाद्यतेल, भाजीपाला, फळभाज्यांचे भाव वाढत असतात. यंदा तर दरवाढीचा कहर झाला आहे. खाद्यतेलाचे दर दुप्पटीहून वाढले आहेत, तर गॅसचे दर महिन्याला वाढत आहे. गेल्या अडीच महिन्यांत गॅसचे दर ६०-६५ रुपयांनी (वर्षभरात २६०-२६५ रुपये) वाढले आहेत. सोबतीला साखर ४०-४२ किलोपर्यंत पाेहोचल्याने सर्वसामान्य कुटुंब मेटाकुटीला आले आहेत.

सध्या प्रत्येक वस्तूचे भाव वाढत आहे. तेल, साखर, गॅस या प्रत्येक कुटुंबाच्या दैनंदिन गरजा आहेत. सोबतीला दैनंदिन भाजीपाला, फळभाज्या आवश्यक आहे. या सर्वांचे दर सातत्याने वाढत आहेत. मात्र, याबाबत राज्य असो की केंद्र सरकार दोघेही दुर्लक्ष करत आहे. सर्वसामान्यांच्या जीवनमरणाचे त्यांना काही पडले नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया गृहिणी देत आहेत. या महागाईचा सर्वात जास्त फटका गृहिणींना बसत आहे. घरसंसार चालवताना अक्षरशा त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

--------

कोरोनाकाळात आमचे रोजगार गेले आहे. गॅसचे दर दर महिन्याला वाढत आहे. केंंद्र सरकारने सबसिडी बंद केली आहे. साथीला वर्षभरापासून तेलाचे दर दुप्पट झाले आहेत. त्यातच आता भाजीपालाचे दरही सातत्याने वाढत आहेत. गरिबांच्या जगण्या-मरण्याचा शासनाला काही घेणं-देणं नसल्याचे हे द्योतक आहे, असेच आम्हाला आता वाटायला लागले आहे.

- मोहिनी साबळे, गृहिणी

-----

होलसेल बाजारातील परिस्थिती वेगळी असते. मात्र, किरकोळ बाजारातील छोठे-मोठे व्यापारी पाऊस, मालाची आवक कमी असल्याचे सांगून प्रचंड भाववाढ करतात. वेगवेगळ्या कारणामुळे प्रत्येकाला होलसेल बाजारात जाऊन भाजीपाला खरेदी करता येत नाही. कोरोनामुळे वर्षभरापासून आर्थिक स्थिती बेताचीच झाली आहे. त्यात दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. सर्वसामान्यांनी कसे जगायचे.

- नंदा ढवळे, गृहिणी

-----

१४ आणि १५ ऑगस्टला जोडून सुटी आल्याने मार्केट यार्डात दुसऱ्या दिवशी भाजीपाल्याची आवक दुप्पट झाली होती. तेव्हा दर निम्म्याने उतरल्याने चांगले दरही मिळू शकले नाहीत. आम्हाला व्यापाऱ्यांकडून अपेक्षित दर मिळत नाही. किरकोळ व्यापारी मात्र शहराच्या विविध भागांत घेतलेल्या भावापेक्षा दुप्पट-तिप्पट दराने मालाची विक्री करत आहेत. पिकवणाऱ्याचा उत्पादन आणि वाहतूकखर्चही निघत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती कधी बदलणार आहे.

- प्रताप कदम, शेतकरी

------

फळभाज्यांचे भाव पुढीलप्रमाणे (प्रतिकिलो)

वाण मार्केट यार्डातील दर इतर ठिकाणचे दर

वाटाणा ७०-७५ १००-१२०

गवार ४०-५० ६०-७५

वांगी १८-२२ ३५-४०

फ्लावर १२-१४ २०-२५

दोडका १०-१४ २२-२८

भेंडी १०-१६ २५-३०

चवळी १६-२० २०-३०

कोबी ४-६ २०-२५

टोमॅटो ६-८ १५-२५

काकडी ८-१० १५-२२

दुधी ५-८ १५-२०

कांदा १८-२२ २५-३०

बटाटा १०-१४ २०-२५

-----

...असे वाढले गॅसचे दर

महिना दर (रुपये)

ऑगस्ट २०२० ६१०

डिसेंबर २०२० ६६१

फेब्रुवारी २०२१ ७३८

एप्रिल २०२१ ८३१

मे २०२१ ८१२

ऑगस्ट २०२१ ८७५