नळावणे रस्त्याचे काम निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:14 IST2021-07-14T04:14:19+5:302021-07-14T04:14:19+5:30
बेल्हा : नळवणे (ता. जुन्नर) येथील उबाळे वस्तीकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्याचे व साकव पुलाच्या कामाचे काम निकृष्ट झाले ...

नळावणे रस्त्याचे काम निकृष्ट
बेल्हा : नळवणे (ता. जुन्नर) येथील उबाळे वस्तीकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्याचे व साकव पुलाच्या कामाचे काम निकृष्ट झाले असून, या डांबरी रस्त्यावर सध्या गवत उगवले आहे. या कामासाठी २६ लाख ९१ हजार रुपयांचा निधी मंजूर असून, हे निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने या कामाच्या विरोधात गावच्या सरपंच अर्चना उबाळे व ग्रामस्थ आक्रमक होऊन रस्त्यावर उतरले.
आम्ही ठेकेदाराशी दूरध्वनीवरून संवाद साधण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांच्याशी संवाद होऊ शकला नाही. संबंधित ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. हा रस्ताही अनेक ठिकाणी उखडला आहे. या वेळी सरपंच अर्चना उबाळे, हौशीराम शिंदे, तुषार शिंदे, पोपट उबाळे, दादू उबाळे यांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रत्यक्ष जाऊन कामाची पहाणी करून खात्री करतो. काम निकृष्ट दर्जाचे असल्यास ठेकेदाराला बिल दिले जाणार नाही. -युवराज मळेकर, सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, जुन्नर
रस्त्याचे चांगले काम झाल्याशिवाय संबंधित ठेकेदाराला बिल देऊ नये, तसेच या रस्त्याच्या कामाची समक्ष अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी करावी.
-सरपंच अर्चना उबाळे
नळावणे (ता.जुन्नर) येथील निकृष्ट रस्त्याचे काम केले असून, रस्त्यावर झाडे उगवलेली दिसत आहेत. सरपंच व ग्रामस्थ पाहणी करताना दिसत आहेत.