कुख्यात गुंड लहू ढेकणेला जिवंत पकडले
By Admin | Updated: May 23, 2015 00:22 IST2015-05-23T00:15:21+5:302015-05-23T00:22:37+5:30
कोल्हापूर पोलिसांची कारवाई : संशय ठरला खरा; ती व्यक्ती कोण..?

कुख्यात गुंड लहू ढेकणेला जिवंत पकडले
कोल्हापूर : पुणे व सातारा जिल्ह्यांतील कुख्यात गुंड व पॅरोलवर सुटलेला कैदी लहू रामचंद्र ढेकणे (रा. देगाव, ता. भोर, जि. पुणे) याला शुक्रवारी सायंकाळी कोल्हापुरातील रेल्वेस्थानक परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पकडले.
गेल्या शनिवारी (दि. १६ ) पाचगाव (ता. करवीर) येथे मुंडके व दोन्ही हात तोडून खून झालेली ती व्यक्ती लहू ढेकणे नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ती खून झालेली व्यक्ती कोण, यासंबंधी कोल्हापूर पोलिस तपास सुरू केला आहे. ज्यादिवशी हा खून उघडकीस आला त्याच दिवशी पोलिसांनी ढेकणे यांनेच हा बनाव केला असल्याचा संशय व्यक्त केला होता.तसेच घडले आहे.
सातारा जिल्ह्यातील शिरवळ (ता. खंडाळा) येथील शाळकरी मुलाच्या खून प्रकरणी न्यायालयाने लहू ढेकणेला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तो कळंबा मध्यवर्ती कारागृहातून (पान ८ वर)
ढेकणे नाट्याचा पर्दाफाश करु
गुंड लहू ढेकणे सापडला आहे.त्याने हे नाट्य कशासाठी केले? खून झालेली ती व्यक्ती कोण? यादिशेने कोल्हापूर पोलीस तपास करीत आहे. लवकरच याचा शोध लागेल असा विश्र्वास गृहराज्यमंत्री प्रा.राम शिंदे यांनी व्यक्त केला.
यासंदर्भात मी पहिल्यापासूनच सांगत आलेलो आहे. लहू ढेकणे हा अतिशय चलाख वृत्तीचा असून, तो दुसऱ्याचा खून करून स्वत:चं अस्तित्व मिटविण्याचाही प्रयत्न करू शकतो. संबंधित मृतदेह हा लहूचाच आहे, असं म्हणणाऱ्या लहूच्या भावावर गुन्हा दाखल करावा. त्याचप्रमाणे कळंबा कारागृहातून पॅरोलवर सुटल्यानंतर त्याठिकाणी असलेले अधिकारी, संबंधित कर्मचारी व राजगड पोलिसांना निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी करावी. या घटनेवरून लहू ढेकणेला शासन सांभाळू शकत नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याला सामान्य नागरिकांच्या हवाली करावे.
- सूर्यकांत भांडे-पाटील, संकेत भांडेचे वडील व फिर्यादी
पुण्यात पकडल्याचा संशय
कुख्यात गुंड लहू ढेकणेला गुरुवारी (दि. २१) रात्री उशिरा कोल्हापूर पोलिसांनी पुण्यातून कोल्हापुरात पकडून आणले असल्याची यावेळी चर्चा होती. त्याच्याकडे पोलीस कसून चौकशी करीत आहेत. या चौकशीमधून धागेदोरे सापडणार असून खून झालेला ती व्यक्ती
कोण? याचाही उलगडा होणार आहे.