इंद्रायणीतीरी वैष्णवांचा मेळा!
By Admin | Updated: June 19, 2014 05:20 IST2014-06-19T05:20:59+5:302014-06-19T05:20:59+5:30
विठूरायाच्या चरणी लीन होण्यासाठी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा गुरुवारी दुपारी अडीचला पंढरीकडे मार्गस्थ होणार आहे

इंद्रायणीतीरी वैष्णवांचा मेळा!
श्रीक्षेत्र देहूगाव : विठूरायाच्या चरणी लीन होण्यासाठी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा गुरुवारी दुपारी अडीचला पंढरीकडे मार्गस्थ होणार आहे. पालखी प्रस्थान सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून, राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंड्यांसह वारकरी देहूनगरीत दाखल झाले आहेत. अखंड हरिनाम गजर सुरू झाला आहे.
इंद्रायणी तीरावरील देहूनगरीत पालखी सोहळ्याच्या पूर्वसंध्येला भक्तिचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून आले. संत तुकाराममहाराज देवस्थान ट्रस्टकडून सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. सोहळ्यासाठी प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या विविध सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा प्रशासन, पंचायत समितीची आज लगबग दिसून आली. सुरक्षेचा आढावाही पोलिसांनी घेतला. तसेच वाहतुकीचेही नियोजन करण्यात आले. परभणी जिल्ह्यातील बाभूळगावकर, तसेच अकलूजच्या माहिते-पाटलांचा मानाचा अश्व दाखल झाला आहे. (वार्ताहर)