शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'हारा वही जो लड़ा नहीं', दुर्दम्य इच्छाशक्ती; एका पायाने त्यांनी सर केले कळसूबाई शिखर

By श्रीकिशन काळे | Updated: January 3, 2024 13:10 IST

दिव्यांगांचे प्रश्न सुटावेत आणि सरकारचे याकडे लक्ष वेधावे म्हणून त्यांनी हे धाडस केले

पुणे: एका पायाने चालता येत नाही. सोबत एलबो क्रचेस घ्यावी लागते. वजन ९० किलो आणि तरी देखील दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे त्यांनी कळसूबाई (१६४६ मीटर) शिखर लिलया सर केले. हे धाडस केवळ सरकारचे डोके ठिकाणावर यावे यासाठी केले. धर्मेंद्र सातव असे त्या दिव्यांग कार्यकर्त्याचे नाव आहे. दिव्यांगांचे प्रश्न सुटावेत आणि सरकारचे याकडे लक्ष वेधावे म्हणून हा खटाटोप त्यांनी केला. 

गेली अनेक वर्षांपासून सातव हे दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी लढत आहेत. त्यांनी याबाबतचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील पाठवले आहे.  सातव यांनी पत्रात नमूद केले आहे की, सरकारी नोकरीतील दिव्यांग अनुशेष भरण्यात यावा व दिव्यांगांना व्यवसायासाठी कर्ज पुरवठा देण्यात यावा‌.  या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मी पायाने  94% दिव्यांगा आहे. तरी देखील सर्वात उंच असलेले कळसूबाई शिखर चढणार आहे. त्याला अनुसरून १ जानेवारी २०२४ रोजी मी कळसुबाई शिखर सर केले. 

सातव यांनी त्यांच्या मागण्यांमध्ये पुढील बाबी नमूद केल्या आहेत. सरकारने तत्काळ दिव्यांगांचा नोकरीतील अनुशेष आरक्षण कोटा पूर्ण भरावा, कंत्राटी भरती मध्ये 4% दिव्यांगांना नोकरी द्यावी, मागील पाच सहा वर्षापासून अपंग वित्त महामंडळ महाराष्ट्र राज्य यांनी एकाही दिव्यांगांना व्यवसायासाठी कर्ज दिले गेले नाही. त्यामुळे लाखो दिव्यांग उदरनिर्वाहासाठी स्वतःचा व्यवसाय करू शकत नाहीत. अपंगांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे. या सातव यांच्या मागण्या आहेत. 

कळसुबाई शिखर एका पायाने चढण्याचा उद्देश हा होता की, अपंगाला शारीरिक व्यंगामुळे कुणी कमजोर समजू नये. अपंग आपल्या शारीरिक अंगावर मात करून सरकारी सेवेत चांगल्या पद्धतीने नोकरी करेल. त्यामुळे नवीन वर्षात 2024 मध्ये सरकारने दिव्यांगांसाठी असलेल्या नोकऱी मधील  4% टक्के आरक्षण मधील सर्व कोटा भरून दिव्यांगांना नोकरी द्यावी. तसेच व्यवसाय साठी कर्ज देणे बंद असलेले ते तत्काळ सुरू करुन दिव्यांगांना व्यवसायासाठी कर्ज पुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी धर्मेंद्र सातव यांनी केली आहे.  सातव यांच्या सोबत प्रिया लोखंडे, बापू कोकरे, सिध्दराम माळी, दादा ठोंबरे, दादा काळूखे यांनी देखील सहभाग घेतला.

टॅग्स :PuneपुणेTrekkingट्रेकिंगHealthआरोग्यDivyangदिव्यांगSocialसामाजिकGovernmentसरकार