शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

भारतीय बनावटीचे चाफ करणार लढाऊ विमानांचे संरक्षण; डीआरडीओनं विकसित केली मिसाईल विरोधी यंत्रणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 00:08 IST

आधुनिक युगात नव्या युद्ध प्रणालीमुळे युद्धाचे स्वरूप बदलत आहे. त्यात लढाऊ विमामांचे तंत्रज्ञान हे गुंतागुंतीचे असते. हवाईदल जेवढे सक्षम आणि आधुनिक असेल तेवढेच शत्रू पक्षावर विजय मिळवण्याची शक्यता असते.

निनाद देशमुख 

पुणे : हवाई युद्धात शत्रूच्या घातक क्षेपणास्त्रांपासून लढाऊ विमानांचे संरक्षण करण्यासाठी अॅडव्हान्स चाफ टेक्नॉलॉजी डीआरडीओच्या पुण्यातील उच्च ऊर्जा पदार्थ विज्ञान प्रयोगशाळा (एचइएमआरएल) आणि जोधपूर येथील डिफेन्स रिसर्च या डीआरडीओच्या दोन प्रयोगशाळांनी तयार केली आहे. सुरवातीला भारतीय हवाई दलातील मिराज आणि ज्याग्वार या लढाऊ विमानांवर ही यंत्रणा बसवली जाणार आहे. देशी बनावटीच्या या नव्या प्रणालीमुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल. तसेच या प्रकारच्या विदेशी यंत्रणेवरचे परकीय अवलंबित्वही कमी होईल. (Indian-made Chaf to protect fighter jets; DRDO developed anti-missile system)

आधुनिक युगात नव्या युद्ध प्रणालीमुळे युद्धाचे स्वरूप बदलत आहे. त्यात लढाऊ विमामांचे तंत्रज्ञान हे गुंतागुंतीचे असते. हवाई दल जेवढे सक्षम आणि आधुनिक असेल तेवढेच शत्रू पक्षावर विजय मिळवण्याची शक्यता असते. यामुळे लढाऊ विमानविरोधी अनेक क्षेपणास्त्र आज विकसित करण्यात आली आहे. विमानातून निघणाऱ्या किरणोत्सर्गाचा वेध घेत क्षेपणास्त्रे ते हवेतच नष्ट करू शकतात. या प्रकारच्या क्षेपणास्त्राना चकविण्यासाठी चाफ यंत्रणा महत्वाची असते. चाफ हा लढाऊ विमानाचा एक महत्त्वाचा घटक आहे. लढाऊ विमानांइतकेच किरणोत्सर्ग निर्माण करणे हे चाफ यंत्रणेचे मुख्य काम असते. शत्रूच्या क्षेपणास्त्राची माहिती लढाऊ वैमानिकाला रडारवर मिळताच वैमानिक हे चाफ क्षेपणास्त्रासारखे डागतो. दरम्यान चाफ विमाना एवढाच किंबहुना त्या पेक्षा जास्त किरणोसर्ग तयार करून शत्रूच्या मार्गदर्शित क्षेपणास्त्राला गोंधळात टाकतो. यामुळे क्षेपणास्त्र हवेत भरकटुन विमानाचे संरक्षण होते, अशी माहिती डीआरडीओच्या एका शास्त्रज्ञाने नाव न सांगण्याच्या अटीवर 'लोकमत'ला दिली. 

फायबर आधारित चाफचा वापर केला जातो. नव्याने विकसित केलेला चाफ अॅल्युमिनियमवर आधारित फायबरचे आहे. ग्लास फायबरपेक्षा देशी चाफ यंत्रणेची किरणोत्सर्ग निर्माण करण्याची क्षमता अधिक आहे, असे या यंत्रणेच्या निर्मितीत सहभागी असलेल्या  डीआरडीओच्या एका वरिष्ठ शास्त्रज्ञांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

सर्व चाचण्या पूर्ण -प्रत्येक लढाऊ विमानात चाफ बसवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असते. एका विमानाला सुमारे 300 चाफ बसवण्याची क्षमता असते. स्वदेशी पद्धतीने विकसित केलेली चाफ यंत्रणा  विदेशी यंत्रानेपेक्षा स्वस्त आणि किफायतशीर ठरणार आहे. दोन महिन्यांपूर्वी ग्वाल्हेर एअर फोर्स स्टेशनवर या नव्या प्रणालीच्या चाचण्या भारतीय हवाईदल आणि डीआरडीओच्या शास्त्रज्ञानी घेतल्या. भारतीय हवाई दलाच्या सर्व मागण्या या नव्या प्रणालीने पूर्ण केल्या आहेत.

लवकरच हवाईदल वापरणार देशी चाफ -दिल्ली येथील  डीआरडीओ मुख्यालयाने यासंदर्भात परिपत्रक काढले आहे. त्यानूसार लवकरच भारतीय हवाईदल ही नवी यंत्रणा वापरण्यास सुरुवात करणार आहे.  डीआरडीओची नागपूर येथील प्रयोगशाळा आणि हैदराबाद स्थित खाजगी कंपन्या या प्रणालीचे उत्पादन करणार आहेत. त्यांना तंत्रज्ञान  हस्तांतरित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. परदेशी चाफची किंमत सुमारे ५०,००० च्या जवळपास आहे. तर देशी चाफ्याची किंमत आठ ते दहा हजार एवढी आहे.

टॅग्स :DRDOडीआरडीओairforceहवाईदलfighter jetलढाऊ विमानindian air forceभारतीय हवाई दल