शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

बालसंरक्षण व विश्वशांतीसाठी सायकलवरून भारत दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 20:01 IST

बालकांसाठी प्रशिक्षण शिबिरे, पॉस्को कायद्याविषयक मार्गदर्शन, अत्याचारात बळी बडलेल्या पीडितांचे मनोबल वाढवणे आणि बालकांवर अत्याचाराबाबत जागरुकता निर्माण करणे असे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देअत्याचाराच्या घटनांत वाढ : पुण्यातील दोन तरूणांचा उपक्रम सुमारे ११ हजार किलोमीटरचा प्रवास करून दोघे पुन्हा पुण्यात परतणार देशातील २० राज्यांतून प्रवास, १५० दिवसांत मोहीम

पुणे : बालकांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण वाढतच आहे. लोणी स्टेशन बाहेर झोपलेल्या एक वर्षाच्या मुलीला उचलून नेत तिच्यावर अत्याचार करून तिचा खून केल्याची अतिशय संतापजनक व माणुसकीला काळिमा फासणारी घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्यामुळे बालसंरक्षण आणि विश्वशांतीसाठी पुण्यातील दोन तरुणांनी सायकलवरून भारत दौरा सुरू केला आहे. सायकलप्रेमी महेश क्षीरसागर आणि आकाश अडसूळ अशी या देन सायकलप्रेमी व भारत दौऱ्यातील युवकांची नावे आहेत. सुमारे ११ हजार किलोमीटरचा प्रवास करून दोघे पुन्हा पुण्यात परतणार आहे. रविवारी सकाळी शनिवारवाडा येथून दोघांनीही आपल्या या मोहिमेला सुरूवात केली. विश्वशांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. यशराज पारखी आणि मुस्कान संस्थेचे पदाधिकाऱ्यांच्या हस्ते झेंडा दाखवून हा मोहिमेची सुरुवात करण्यात आली. देशातील २० राज्यांतून त्यांचा प्रवास होणार असून १५० दिवसांत ही मोहीम पूर्ण करणार असल्याची माहिती महेश क्षीरसागर यांनी दिली. अडसूळ म्हणाले, गेल्या काही वर्षांमध्ये बालकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे या घटनांचा निषेध करीत बाल लैगिंक अत्याचाराला विरोध करण्यासाठी तसेच जगात शांतता नांदावी यासाठी हा दौरा करण्यात येत आहे. प्रवासामध्ये आम्ही ठिकठिकाणी शाळा आणि कॉलेजला भेटी देणार आहोत. त्याठिकाणी बालकांसाठी प्रशिक्षण शिबिरे, पॉस्को कायद्याविषयक मार्गदर्शन, अत्याचारात बळी बडलेल्या पीडितांचे मनोबल वाढवणे आणि बालकांवर अत्याचाराबाबत जागरुकता निर्माण करणे असे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

टॅग्स :Puneपुणेshanivar wadaशनिवारवाडाIndiaभारत