शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

"शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस, साखर निर्यातीत भारत जगात अव्वल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 06:44 IST

द डेक्कन शुगर टेक्नाॅलाॅजिस्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित वार्षिक साखर परिषदेत त्यांनी याविषयी माहिती दिली

लोकमत न्यूज नेटवर्क  पुणे :  साखर निर्यातीत भारत जगात अव्वल ठरला आहे. साखरेच्या निर्यातीत आपण विक्रम केला असून, दुसरा क्रमांक ब्राझील देशाचा आहे. तिसऱ्या क्रमांकावर आपले महाराष्ट्र राज्य आहे. इतर देशांना मागे टाकून एका राज्याने ही कामगिरी करून दाखविली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा हादेखील एक विक्रम झाला आहे, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. 

द डेक्कन शुगर टेक्नाॅलाॅजिस्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित वार्षिक साखर परिषदेत त्यांनी याविषयी माहिती दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस आल्याचेही त्यांनी नमूद केले. गायकवाड म्हणाले, साखर उत्पादनात १ लाख कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. आपण ११२ लाख टन साखर निर्यात केली आहे. त्यात महाराष्ट्राचा वाटा ७५ लाख टनांचा आहे. साखर धंद्याला सोन्याचे दिवस आले आहेत. शेतकऱ्यांनाही पैसा मिळत आहे. आता शनिवारपर्यंत (दि. १७) आपण शेतकऱ्यांच्या खात्यात ४२ हजार ६०० कोटी रुपये दिले आहेत.

साखर कारखाने होत आहेत इंधनाचे कारखानेइथेनाॅल निर्मितीवरदेखील आपला भर आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र यात पुढे आहे. २० हजार कोटींची गुंतवणूक होत आहे. तसेच साखर कारखान्यातून पोटॅश निर्मितीही केली जात आहे. साखर कारखाने इंधनाचे कारखाने म्हणून पुढे येऊ लागले आहेत. जगातील साखरेतील आयएसओचे केंद्र महाराष्ट्रात यावे यासाठी आता पुढाकार घ्यायला हवा, असे गायकवाड म्हणाले.

इथेनाॅल निर्मितीवर भर द्यावा - पवारसाखर निर्यातीमध्ये भारत जगात अव्वल असला, तरी इथेनाॅल निर्मितीवर अधिक भर द्यायला हवा. साखर धंद्यात अधिक संशोधन व्हावे आणि त्यासाठी मोठी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. साखर उत्पादनातील संशोधनासाठी अर्थसंकल्पात तरतूद हवी. आतापर्यंत तशी तरतूद केलेली ऐकिवात नाही. या क्षेत्रात गुंतवणूक करण्याची मानसिकता निर्णय घेणाऱ्यांमध्ये यावी, अशी अपेक्षा खासदार शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSharad Pawarशरद पवार