शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

भारत ‘ बिनडोक’ लोकांचा देश आहे : अ‍ॅड. असीम सरोदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 21:27 IST

समाजाचं डोकं ठिकाणावर असेल तर काय चांगलं काय वाईट हे समजेल.

पुणे : भारत हा ‘बिनडोकं’ लोकांचा देश आहे. लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरचं नव्हे तर संविधानही कळलेले नाही. त्यांनी दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्यही उमजलेले नाही. नथुराम गोडसे नाटक यायला हवं. मोदींवरचा चित्रपट आणि ‘अँक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’सारखे चित्रपट देखील यायला हवेत. समाजाचं डोकं ठिकाणावर असेल तर काय चांगलं काय वाईट हे समजेल. त्यामुळे चित्रपटांवरची ‘सेन्सॉरशीप’ ही बंद झाली पाहिजे, असे परखड मत मानव अधिकार विश्लेषक अ‍ॅड. असीम सरोदे यांनी व्यक्त केले. मुक्तांगण फाऊंडेशनच्या दुस-या वर्धापनदिनानिमित्त आयोजित  प्रेरणा पुरस्कार सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी  फाऊंडेशनचे अध्यक्ष नारायण कांबळे, उपाध्यक्ष व अभिनेते विजय पाटकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.सरोदे म्हणाले, पूर्वी संवेदनशील विषयांमधून समाजामध्ये जनजागृती केली जात होती. त्यासाठी चित्रपट हे प्रभावी माध्यमं होतं. मात्र आज चित्रपटांमधून प्रतिकात्मकता बदलण्यावर भर दिला जात आहे. चित्रपटांमध्ये शिवी वगैरे चालत नाही. समाजातील भाषा चित्रपटांमध्ये वापरण्यावर आक्षेप घेतला जातो. सेन्सॉर बोर्डाच्या नावाखाली चित्रपट दडपले जात आहेत. घटनाबाहय सत्ताकेंद्र निर्माण होत आहेत. त्यावर गांभीर्याने विचार करायला हवा. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे मुक्त असायला हवं. 2014 च्या निवडणूकीत वाईट संदेश, चित्र दिसले हे कुणी सुरू केले हे सर्वांना माहिती आहे. आता इतर कुणी या गोष्टी केल्या तर कारवाई का होते? आपल्या जबाबदारीचे भान ठेवून वागत असलेला समाज विकसनशील असतो. मानवी प्रतिष्ठेसह सगळ्यांना जीवन जगण्याचा अधिकार आहे. नथुराम गोडसे यावर नाटक येत असलं तर ते यायला हवं. अशा गोष्टींमुळे गोडसे महान होत नाहीत. 

टॅग्स :PuneपुणेAsim Sarodeअसिम सराेदेLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालNarendra Modiनरेंद्र मोदी