शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Supriya Sule: इंडिया आघाडीच्या नेत्यांची सत्ता स्थापनेची इच्छा; सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

By अजित घस्ते | Updated: June 6, 2024 18:43 IST

सत्ता स्थापनेसाठी इंडिया आघाडीकडे नसली तरी इंडिया आघाडीच्या नेत्यांची सत्ता स्थापनेची इच्छा आहे

पुणे: सत्ता स्थापनेसाठी भाजपची संपूर्ण तयारी झाली आहे. नरेंद्र मोदी रविवारी पंतप्रधानपदाची शपथही घेणार आहेत. तर दुसरीकडे इंडिया आघाडीच्या बैठका सुरु आहेत. इंडिया आघाडीकडून घटक पक्षांना सामील करून घेण्यासाठीचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीये. यावरून इंडिया आघाडी सत्ता स्थापनेसाठी प्रयत्नशील असल्याचे दिसू लागले आहे. या घडामोडींबाबत सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिलीये. सत्ता स्थापनेसाठी इंडिया आघाडीकडे मॅजिक फिगर नाही. परंतु इंडिया आघाडीच्या नेत्यांची सत्ता स्थापनेची इच्छा आहे असे यावेळी म्हणाल्या आहेत. 

खासदार सुप्रिया सुळे निवडून आल्यानंतर पुण्यात प्रथमच  मार्केटयार्डात येथे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी राज्यभिषेक दिन निमित्ताने खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रथम मार्केटयार्ड छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मोठ्या उत्साहात फुले आणि गुलालाची उधळण करून पारंपरिक वाद्य वाजवत जंगी स्वागत केले. यावेळी कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादीचे सर्वेशेवा शरद पवार यांची प्रतिमा हातात घेऊन पवार साहेबांच्या विजयाचा जयघोष करण्यात आला.

सुळे म्हणाल्या, महाराष्ट्रात महागाई, दुष्काळ, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार अशी मोठी आव्हाने राज्याच्या समोर होती. सर्वत्र राज्यभर दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून अनेक ठिकाणी छावण्याची मागणी असून ती मान्य होत नाही. चारा डेपो नसून पाण्याचे टँकर देखील वेळेवर पोहोचत नाहीत. या सर्व प्रकाराला राज्यातील जनता त्रस्त झालेली आहे. जनतेने महाविकास आघाडीला दिलेली साथ यामुळे कामाची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. म्हणून यापुढे आणखीन जबाबदारी वाढलीये. काम करीत राहणे आणि विकास करणे हेच खरे कार्य आहे. 

दुष्काळासाठी मदत करा

राज्यात तीव्र दुष्काळाची परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्याची अडचण असून, शेतीला पाणी नाही. यामुळे रोहित पवार आणि मी उद्या पासून महाराष्ट्र दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दौरा सुरू केला आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकत्यांनी जेसिबी, क्रेनच्या साहाय्याने स्वागत करू नका त्यापेक्षा चारा छावणी, पाणी आणि दुष्काळासाठी मदत करा असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीSupriya Suleसुप्रिया सुळेIndiaभारतParliamentसंसदprime ministerपंतप्रधान