शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत खाणीवर वॉच ठेवण्यासाठी विकसित करणार स्वतंत्र ‘मायनिंग सर्व्हेलन्स सिस्टिम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 16:09 IST

जिल्ह्यातील अनधिकृत खाणी व बेसुमार उत्खनन यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र ‘मायनिंग सर्व्हेलन्स सिस्टिम’ विकसित करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे‘मायनिंग सर्व्हेलन्स सिस्टिम’च्या माध्यमातून सेटलाईट इमेजद्वारे खाण पट्टयांवर वॉचगिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली जिल्हा खनिज प्रतिष्ठानची बैठक

पुणे : शासनाकडून उत्खननाची परवानगी मिळाल्यावर सर्व नियम धाब्यावर बसवत खाण मालकांकडून सर्रसा बेसुमारपणे उत्खनन केले जात आहे. यामुळे पर्यावरणाची प्रचंड मोठी हानी होत असून, शासनाचा दर वर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडतो. जिल्ह्यातील अनधिकृत खाणी व बेसुमार उत्खनन यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र ‘मायनिंग सर्व्हेलन्स सिस्टिम’ विकसित करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठानमार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, या सिस्टिममुळे शासनाच्या महसूलामध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे.जिल्हा खनिज प्रतिष्ठानची बैठक नुकतीच पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी सैरभ राव, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांच्यासह जिल्ह्यातील आमदार व अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्ह्यात बांधित क्षेत्रातील गावांमधील विकास कामे व अनधिकृत खाणी व बेसूमार उत्खनन यावर नियंत्रण करण्यासाठी चर्चा करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यासाठी स्वतंत्र ‘मायनिंग सर्व्हेलन्स सिस्टिम’ विकसित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यासाठी आवश्यक असलेला निधी प्रतिष्ठानमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.‘मायनिंग सर्व्हेलन्स सिस्टिम’च्या माध्यमातून सेटलाईट इमेजद्वारे जिल्ह्यातील खाण पट्टयांवर वॉच ठेवणार आहे. ‘कार्टो साईट’ उपग्रहाचा देखील यासाठी उपयोग करण्यात येणार आहे. या सस्टिसमद्वारे जिल्ह्यात किती खाण पट्ट्यांना परवानगी दिली, ‘खसार मॅप’, किती खाणी सध्या सुरु आहेत, अनधिकृत खाणींची माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच ‘सेटलाईट इमेजद्वारे’ या सर्व खाण पट्ट्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. परवानगी पेक्षा अधिक उत्खनन केले, परवानगी न घेता एखाद्या ठिकाणी खाण सुरु करण्यात आली याची माहिती प्रशासनाला सहज व कार्यालयात बसून सेटलाईट इमेजद्वारे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :girish bapatगिरीष बापटPuneपुणे