मोशीत बसणार स्वतंत्र डीपी बॉक्स

By Admin | Updated: December 23, 2016 00:46 IST2016-12-23T00:46:15+5:302016-12-23T00:46:15+5:30

येथील पेठ क्रमांक ४ मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून विद्युतपुरवठा खंडित होत असल्यामुळे रहिवाशांना विविध समस्यांना सामोरे

Independent DP Box to be installed in Moshi | मोशीत बसणार स्वतंत्र डीपी बॉक्स

मोशीत बसणार स्वतंत्र डीपी बॉक्स

मोशी : येथील पेठ क्रमांक ४ मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून विद्युतपुरवठा खंडित होत असल्यामुळे रहिवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. सध्या तेथे नवीन मीटर वायर टाकण्यात आली असून, स्वतंत्र दोन डीपी बॉक्स बसवण्यात आले आहेत. त्यामुळे वारंवार होणारा विद्युतपुरवठा खंडित होणार नसून, नागरिकांना त्यापासून दिलासा मिळाला आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून या भागात वारंवार वीज खंडित होत असल्यामुळे नागरिकांना अंधारात बसावे लागत असे. सामान्य नागरिकांबरोबर विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसत असे. याबाबत तक्रार केल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपाची उपाययोजना करण्यात येत असे. मात्र वारंवार विद्युतपुरवठा खंडित होत असल्यामुळे सर्वसामान्य लोकांची गैरसोय होत असे.
आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते राहुल सस्ते यांनी येथे विद्युत विभागामार्फत नवीन डीपी बसवत विद्युतचा प्रश्न कायमचा मार्गी लावला असल्याचे नागरिक सांगत आहेत. (वा.प्र)

Web Title: Independent DP Box to be installed in Moshi