विकेंड लॉकडाऊमुळे इंदापूरकर घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:12 IST2021-04-11T04:12:11+5:302021-04-11T04:12:11+5:30
--- इंदापूर : कोरोनाला रोखण्यासाठी जाहिर करण्यात आलेल्या विकेंड लॉकडाउनला इंदापूरकरांनी मोठा प्रतिसादर दिला. एरव्ही विकेंडला फिरायला बाहेर पडणाऱ्या ...

विकेंड लॉकडाऊमुळे इंदापूरकर घरात
---
इंदापूर : कोरोनाला रोखण्यासाठी जाहिर करण्यात आलेल्या विकेंड लॉकडाउनला इंदापूरकरांनी मोठा प्रतिसादर दिला. एरव्ही विकेंडला फिरायला बाहेर पडणाऱ्या इंदापूरकरांनी आजच्या शनिवारी मात्र घरात राहने पसंत केले. त्यामळे इंदापूरातील प्रमुख रस्ते सूनसान दिसत होते तर बाजारपेठेतही सर्वदुकाने बंद असल्यामुळे केवळ चिमण्यांचा किलबिलाट ऐकू येत होता.
इंदापूर शहरातील बस स्थानक, मुख्य बाजार पेठ, चाळीस फुटी रोड, दर्गाह मस्जिद चौक, नेहरू चौक, अकलूज नाका, टेंभुर्णी नाका, पुणे नाका, खुळे चौक, बाबा चौक, इंदापूर नगरपालिका गाळे येथे दररोज दिसणारी गर्दी आज सर्वच दुकाने कडक लॉकडाऊन मुळे बंद असल्याने ओसाड पडलेली दिसत होती. त्यामुळे शहरातील सर्व रस्त्यांवर शुकशुकाट पसरला होता. इंदापूर पोलिसांनी लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी केली असून चौका चौकात पोलीस कर्मचारी व होमगार्ड तैनात केले होते. त्यामुळे लोकांनी बाहेर पडण्याचे धाडस केलेच नाही.
इंदापूर तालुक्यात दिवसाला शंभर पेक्षा अधिक कोविड रुग्ण आढळून येत असल्याने, तालुक्यातील वातावरण तणावपूर्ण व भीतीदायक झाले आहे. इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा हे कर्मचारी व नगरसेवक यांची टीम सोबत घेवून नागरिकांना जागरूक करून, दिलास देवून, लसीकरण व कोविड तपासणीसाठी तयार करीत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती होताना दिसत आहे.
इंदापूर शहरातील व्यापारी वर्गाने शासनाला निवेदन दिले असून, सोमवार ते शुक्रवार रात्री ८ ते सकाळी ६ व शनिवारी व रविवार कडक लॉकडाऊन आम्ही पाळू मात्र, सोमवार ते शुक्रवार सकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत आम्हाला नागरिकांची सेवा करण्याची संधी द्यावी अशी मागणी केली आहे. इंदापूर भाजपाने तर थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्या
--
फोटो १० इंदापूर लॉकडाऊन
फोटो ओळ : इंदापूर शहराततील बाजार पेठेत पसरलेला शुकशुकाट