शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूरकरांची पोटदुखी वाढली, आठवडाभरापासून दुर्गंधीयुक्त पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 03:07 IST

गेल्या आठवड्यापासून इंदापूर नगर परिषदेकडून पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. नागरिकांकडून पोटदुखीचा त्रास होत असल्याच्या तक्रारीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषदेतील विरोधी पक्षनेते पोपट शिंदे, श्रीधर बाब्रस यांनी सोमवारी (दि.५) नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागास भेट दिली.

इंदापूर - गेल्या आठवड्यापासून इंदापूर नगर परिषदेकडून पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. नागरिकांकडून पोटदुखीचा त्रास होत असल्याच्या तक्रारीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषदेतील विरोधी पक्षनेते पोपट शिंदे, श्रीधर बाब्रस यांनी सोमवारी (दि.५) नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागास भेट दिली. पाण्याच्या टाकीची पाहणी केली. या वेळी पत्रकारांशी बोलताना, पाणीपुरवठा विभागाच्या सभापतींनी अद्यापपर्यंत या समस्येची दखल घेतली नसल्याविषयी त्यांनी तीव्रद नापसंती व्यक्त केली.सविस्तर हकिगत अशी की, उजनी पाणलोट क्षेत्रातील इंदापूर नगर परिषदेच्या माळवाडी नं.२ येथील नळपाणी पुरवठा योजनेतून संपूर्ण दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. गेल्या आठवड्यापासून पिवळसर तवंग असणारे दुर्गंधीयुक्त गाळमिश्रित पाणी पिण्यासाठी उपलब्ध होत आहे. हे पाणी प्यायल्यामुळे पोटदुखीचा त्रास होत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून येत आहेत.पत्रकारांशी बोलताना पोपट शिंदे व श्रीधर बाब्रस यांनी दुर्गंधीयुक्त पाण्याचा पिण्यासाठी पुरवठा होत असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र, सत्ताधारी गटाने अद्यापपर्यंत त्यावर उपाययोजना केलेली नाही. पाणीपुरवठा समितीच्या सभापती मनीषा शिंदे यांनी पाणीपुरवठा विभागाची भेट घेऊन चौकशी करण्याचेही सौजन्य दाखवले नाही. त्यामुळे त्यांना नागरिकांच्या आरोग्याचे काही देणे घेणे नाही, हे स्पष्ट दिसत आहे. अजून उन्हाळ्यास सुरुवात झाली नाही, तोपर्यंतच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा गलथान कारभारामुळे संपूर्ण उन्हाळा पार पडेपर्यंत निभाव कसा लागणार, अशी शंका व्यक्त करून, दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्याचा प्रश्न तातडीने मिटला नाही तर आम्ही नगर परिषदेच्या ढिसाळ कामाच्या निषेधार्थ नागरिकांसह रस्त्यावर येऊ, असा इशारा त्यांनी दिला.दरम्यान, उजनी पाणलोट क्षेत्रातील पाण्याची पातळी खालावली आहे. माळवाडी नं.२ येथील पाणीपुरवठा योजनेच्या परिसरात असणाºया जलपर्णी व इतर झाडांच्या लगतचे पाणी पिण्याच्या पाण्यासाठी वापरावे लागत आहे.या झाडांच्या वासामुळे पाण्याला दुर्गंधी येत आहे.नगर परिषदेचा पाणीपुरवठा विभाग पाणी शुद्धीकरणाबाबत कसलाही हलगर्जीपणा करत नाही.सध्या पीएसी पावडर,क्लोरिन, ब्लिचिंग पावडर व बेन्टोनाईट पावडरचा शुद्धीकरणासाठी वापर होत आहे. बेन्टोनाईट पावडरचा साठा संपला होता. मात्र बारामतीहून दोन टन पावडर आणण्यात आल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे अंकुश बोराटे यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी