लाखेवाडी प्रकरणी इंदापूर, बारामतीत निषेध
By Admin | Updated: June 30, 2015 23:06 IST2015-06-30T23:06:15+5:302015-06-30T23:06:15+5:30
लाखेवाडी येथील भिंगारदिवे कुटुंबाला केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मातंग समाजाच्या वतीने बारामती येथे मोर्चा काढण्यात आला होता.

लाखेवाडी प्रकरणी इंदापूर, बारामतीत निषेध
बारामती : लाखेवाडी येथील भिंगारदिवे कुटुंबाला केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मातंग समाजाच्या वतीने बारामती येथे मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी झाली.
लाखेवाडी येथे भिंगारदिवे कुटुंबावर शुक्रवारी (दि. २६) झालेल्या भ्याड हल्ल्याचा सर्वच स्तरांतून निषेध करण्यात येत
आहे. आरोपींनी शेतजमिनीच्या व रस्त्याच्या वादातून या कुटुंबावर हल्ला केला होता.
या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर, सोमवारी सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी भिंगारदिवे कुटुंबीयांची भेट घेऊन विचारपस केली व राज्य शासनाच्या वतीने सर्व मदत करण्याचे अश्वासनही दिले.
या घटनेचे पडसाद बारामती शहर व तालुक्यातही उमटत आहेत. बारामती शहरात मंगळवारी काढण्यात आलेल्या मोर्चात विशाल जाधव, पप्पू भिसे, विजय खरात, साधू बल्लाळ, अनिल गायकवाड, सोमनाथ अजागळे, अमोल इंगळे, विक्रम लांडगे, सोमनाथ पाटोळे, नंदू खरात, बाळासाहेब अजागळे, धनंजय खंडाळे, लखन मांढरे, भाऊ मांढरे, मयूर मोरे, जितू सकट, सागर सकट, जालिंदर घोेडे, सुधीर घोडे यांनी प्रांताधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन दिले. (वार्ताहर)
इंदापूर : लाखेवाडी दलित हल्ला प्रकरणाच्या निषेधार्थ लहूजी शक्ती सेना, दलित स्वयंसेवक संघ, मातंग एकता आंदोलन व रिपाइंच्या वतीने पुकारण्यात आलेल्या ‘इंदापूर बंद’ला आज (दि. ३० जून) इंदापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शहरातील मुख्य बाजारपेठ, सर्व दैनंदिन व्यवहार १०० टक्के बंद होते. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या. इंदापूरकरांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल अरुण ढावरे, दिलीप शिंदे, ललेंद्र शिंदे, सोमनाथ शिंदे, दादासाहेब सोनवणे, राजाभाऊ शिंदे, रायबा मोहिते आदींनी आभार मानले आहेत. रिपाइंच्या वतीने उद्या (दि. १ जुलै) इंदापूर बंदचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले उद्या इंदापूरला येणार आहेत. लाखेवाडीस भेट देणार आहेत. त्यामुळे उद्याचा बंद स्थगित करण्यात आला. त्याऐवजी आज पुकारण्यात आलेल्या इंदापूर बंदला रिपाइंने पाठिंबा दिला होता. बंद पाळण्याचे आवाहन केले होते,अशी माहिती रिपाइंचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव मखरे यांनी दिली.