इंदापूरला अशुद्ध पाणी

By Admin | Updated: October 4, 2014 23:24 IST2014-10-04T23:24:12+5:302014-10-04T23:24:12+5:30

मागील पंधरा दिवसांपासून इंदापूर शहरातील निम्म्या भागात पिवळ्या रंगाच्या दरुगधीयुक्त पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे,

Indapur has impure water | इंदापूरला अशुद्ध पाणी

इंदापूरला अशुद्ध पाणी

>इंदापूर : मागील पंधरा दिवसांपासून इंदापूर शहरातील निम्म्या भागात पिवळ्या रंगाच्या दरुगधीयुक्त पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे, त्यामुळे संतापलेल्या नागरिक-सामाजिक कार्यकत्र्यानी सरस्वतीनगर भागातील पाणी शुद्धीकरण केंद्राला कुलूप लावण्याचा प्रयत्न केला. नगर अभियंता व पाणीपुरवठा विभागाच्या प्रमुखांनी या वेळी कार्यकत्र्याची समजूत काढली. 
जिल्ह्यातील धरण परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे धरणो पूर्ण भरली, त्यामुळे कालव्याद्वारे तलावांमध्ये पाणी सोडण्यात आले. इंदापूर शहराच्या निम्म्या भागास पाणीपुरवठा करणारा तरंगवाडी तलावही पूर्ण क्षमतेने भरला. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून पिवळ्या रंगाच्या दरुगधीयुक्त पाण्याच्या पाण्याचा पुरवठा सरस्वतीनगर, जावईवाडी, कसबा पेठ, अण्णा भाऊ साठेनगर, डॉ. आंबेडकरनगर आदी भागात होत आहे.
त्यामध्ये बदल होत नसल्याने स्थानिक बाळा ढवळे, बजरंग राऊत, नगरसेवक गजानन गवळी, 
माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, अरुण ढावरे, चंदू सोनवणो व इतरांचा सरस्वतीनगर भागातील पाणी शुद्धीकरण केंद्राच्या प्रवेशद्वाराला कुलूप घालण्याचा हेतू होता. 
मात्र, नगर अभियंता नेताजी पवार, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अशोक जाधव यांनी घटनास्थळी येऊन सर्वाची समजूत घातली. तसेच उद्यापासून स्वच्छ, दरुगधीमुक्त पाण्याचा पुरवठा होईल, असे आश्वासन त्यांनी दिले. (वार्ताहर)
 
4नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अशोक जाधव म्हणाले, ‘सध्या तरंगवाडी तलाव पूर्णपणो भरला आहे. पानवनस्पतींच्या मुळांमुळे पाणी शुद्ध करूनही त्यास पिवळ्या रंगाची छटा आली आहे, त्यामुळे दरुगधी येत आहे. तुरटी अथवा ब्लिचिंग पावडरमुळे त्यात फरक पडत नाही. बेंटोमॅक्स पावडर मागविली आहे. तिच्या वापरानंतर चित्र बदलेल. 
4सर्वच प्रचारात दंग आहेत, त्यामुळे लोकांच्या अशा समस्यांकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही, असे नगरसेवक गजानन गवळी यांनी सांगितले. गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी ‘बेंटोमॅक्स’ या पावडरची मागणी करण्यात आली आहे. मात्र, पुरवठा अजून झालेला नाही. या पावडरमुळे पाणी अधिक शुद्ध होते.’

Web Title: Indapur has impure water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.