शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

भरपावसाळ्यात इंदापूर कोरडेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 01:18 IST

इंदापूर तालुक्यात पावसाने पाठ फिरवली असल्याने दिवसेंदिवस पाण्याची समस्या गंभीर होत आहे.

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यात पावसाने पाठ फिरवली असल्याने दिवसेंदिवस पाण्याची समस्या गंभीर होत आहे. ओढे, नाले वाहून गेले नसल्याने अर्धा पावसाळा संपत आला, तरीही कोरडे ठणठणीत दिसत आहेत. पाणी नसल्यामुळे विहिरीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची घट निर्माण झालेले चित्र आहे.तालुक्याच्या पश्चिमेकडील भागातील पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या जिरायती भागातील शेतकºयांवर ऐन पावसाळ्यात पाण्याचे संकट ओढवले आहे. ज्या भागातील शेतकºयांना नीरा डाव्या कालव्याचे पाणी आवर्तने पूर्वीपासून मिळत नाहीत, अशा हजारो शेतकºयांना दरवर्षी दुष्काळास सामोरे जाण्याची वेळ येत आहे.नीरा नदीच्या पाण्यावर अवलंबून असणाºया शेतकºयांची दयनीय अवस्था झालेली आहे. पावसाळा अर्धा संपत आलेला असला, तरीही अद्याप तालुक्यात पाऊस न झाल्याने तालुक्यातील ओढे-नाले अजूनही खळखळून वाहिलेच नाहीत. त्यामुळे विहिरीच्या पाण्याची पातळी दररोज घटत चालल्याने शेतकºयांत भीतीचे वातावरण पसरलेले आहे. आॅगस्ट महिना सुरुवात झालेला असला तरीही खरिपाची अद्याप पेरणी झालेली नसल्याने येथील शेतकरी आर्थिक संकटातून जाताना दिसत आहेत.इंदापूरच्या पूर्व भागाला पावसाची प्रतीक्षाबाभूळगाव : आॅगस्ट महिना सुरू झाला तरी आकाशात फक्त मोकळे पांढरे ढग येत आहेत. इंदापूर तालुक्यातील बाभूळगाव, हिंगणगाव, बेडशिंग, अवसरी, भाटनिमगाव, भांडगाव परिसरात पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. पेरण्या केलेल्या शेतातील उभी पिके आता धोक्यात आली आहेत. खरीप हंगाम आता असाच जातोय की काय, अशी शेतकºयांना भीती वाटू लागली आहे. पाऊस लांबला तर पिण्याच्या व शेतीचा पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे इंदापूरच्या पूर्व भागात दिसत आहेत.>मेंढपाळ चिंताग्रस्त! ‘इकडे आड तिकडे विहीर’लोकमत न्यूज नेटवर्कवालचंदनगर : इंदापूर तालुक्यात जनावरांच्या चारा-पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यात परजिल्ह्यातील आलेल्या मेंढपाळांना थाराच मिळत नसल्याने गावी परतही जाता येईना व पुढे जाण्याची हिंमतही होईना, अशी अवस्था आहे. ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी अवस्था मेंढपाळांची झालेली आहे.जून महिन्यात दरवर्षी सातारा, सांगली व बारामतीच्या पश्चिमेकडील भागातील पुरंदर, सुपे येथील मेंढपाळ हंगामात दरवर्षी मजल दरमजल करीत मराठवाडा गाठत असतात. इंदापूर तालुक्यात या मेंढपाळांचा पहिला टप्पा जवळजवळ दोन तेतीन महिन्यांचा ठरलेला असतो. तालुक्यात या वर्षी पावसाने दडी मारली आसल्याने मेंढ्यांनाचारा उपलब्ध झालेला नाही. नदी-नाले-ओढे पावसाअभावी कोरडे ठणठणीत पडलेले असल्याने मेंढ्यांना पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे.स्थानिक शेतकºयांच्या जनावरांच्या चारा-पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊन बसलेला आहे. त्यात परजिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने मेंढ्या दाखल झाल्या आहेत. त्यांचा पिण्याच्या पाण्याचा व चारा यांचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे.पहिल्याच टप्प्यात अपयश आल्यामुळे मराठवाड्यापर्यंत जाण्याचे स्वप्न भंगले जात आहे. परत गावी जाण्याचा विचार काही मेंढपाळांना करावा लागत आहे.>पावासाने ओढ दिल्याने पाण्याची समस्या गंभीरधरणक्षेत्रात थोडाफार पाऊस झालेला असल्याने नीरा नदीला पाणी सोडण्यात आलेले होते. परंतु, हे पाणी कमी प्रमाणात सोडण्यात आले होते.नदीवर जागोजागी ७ ते ८ ठिकाणी कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे असून, ते पाणी शेवटच्या बंधाºयापर्यंत पोहोचले नसल्यामुळे नदीच्या पाण्यावर अवलंबून असणारे शेतकºयाने धास्ती घेतलेले आहे.नदीच्या पाण्यावर अवलंबून असणाºया शेतकºयांच्या जनावरांच्या चारा-पाणी समस्या लक्षात घेऊन नदीच्या पात्रात पाणी सोडल्यास शेकडो शेतकºयांच्या जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे येथील संकटात सापडलेल्या शेतकºयांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.>डाळिंबाचे दर पन्नास टक्क्यांनी घटलेबिजवडी : पावसाने दिलेली ओढ व मालवाहतूकदारांच्या संपाचा परिणाम डाळिंब बाजारावर झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी १०० रुपयांच्या पुढे असणारा दर आता पन्नास टक्क्यांनी घटला आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.डाळिंबफळ पिकाचे दर कमालीचे घसरत आहेत. दुय्यम दर्जाचे डाळिंब सरासरी २० ते २५ रुपये आणि प्रथम दर्जाचे साधारणत: ३०० ते ४०० ग्रॅम वजनाचे डाळिंब ५० ते ६० रुपयांच्या दरम्यान आहे.काही दिवसांपूर्वी हाच बाजारभाव १०० रुपयांच्या पुढे होता. त्यामुळे शेतकरीवर्ग कमलीचा चिंताग्रस्त असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. डाळिंब पीक वाचविण्यासाठी शेतकºयांनी एन उन्हाळ्यात टँकरने पाणी आणून आपल्या बागा वाचविल्या आहेत.तसेच त्यावर पडणाºया विविध रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महागडी औषधे, त्याची देखभाल आणि केलेले कष्ट आणि त्या तुलनेत मिळणारा बाजारभाव यामुळे शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथील डाळिंब आडत व्यापारी के. डी. चौधरी उद्योगचे संचालक कानकाटे यांनी सांगितले, की शेतकºयांनी आपल्या डाळिंबाची गुणवत्ता ओळखून तो शेतामधून थेट व्यापाºयाला देत असताना सरासरी बाजारभावाचा विचार करावा तसेच त्या व्यापाºयाकडून आपली आर्थिक फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी.जर शेतकºयांनी आपला माल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणला तर त्यांना योग्य हमीभाव देण्याची जबाबदारी बाजार समितीची असते तसेच त्यांची आर्थिक फसवणूक होत नाही. त्याच्या मालाला योग्य हमीभाव देण्यासाठी येथील आडतदार कटिबद्ध असतात.