इंदापूर काँग्रेसचे बोंबाबोंब आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:12 IST2021-09-18T04:12:17+5:302021-09-18T04:12:17+5:30

तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, जिल्हाध्यक्ष सोमनाथ दौंडकर व इंदापूर येथे तालुका अध्यक्ष स्वप्निल सावंत यांच्या ...

Indapur Congress's bombing movement | इंदापूर काँग्रेसचे बोंबाबोंब आंदोलन

इंदापूर काँग्रेसचे बोंबाबोंब आंदोलन

तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, जिल्हाध्यक्ष सोमनाथ दौंडकर व इंदापूर येथे तालुका अध्यक्ष स्वप्निल सावंत यांच्या नेतृत्वाखाली, इंदापूर तालुका युवक काँग्रेसच्यावतीने आपल्या डिग्री जाळत, बेरोजगार दिन म्हणून आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकार हाय हाय...! भाजप सरकार हाय हाय...! अशी मोठ्याने घोषणाबाजी करण्यात आली.

स्वप्निल सावंत म्हणाले की, देशातील दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन देऊन सत्तेत आलेले मोदी सरकार आपल्या आश्वासनांची पूर्ती करू न शकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी देशात काँग्रेसने डिग्री चुलीत घाला हे अनोखे आंदोलन केले आहे. त्यामुळे आम्ही तहसील कार्यालयासमोर चूल मांडून त्या चुलीमध्ये युवकांनी प्राप्त केलेल्या पदवीच्या छायांकित प्रती जाळून मोदी सरकारचा निषेध केला आहे.

यावेळी इंदापूर तालुका काँग्रेस युवकाध्यक्ष अमोल बंडगर, जिल्हा युवक सरचिटणीस श्रीनिवास पाटील, चेतन कोरटकर, शहराध्यक्ष चमनभाई बागवान, किसान काँग्रेस सेलचे तालुकाध्यक्ष डॉ. संतोष होगले, जिल्हा सरचिटणीस जकीरभाई काझी, कार्याध्यक्ष काकासाहेब देवकर, निवास शेळके, महादेव लोंढे, प्रदीप शिंदे, युवराज गायकवाड, दादा शेंडगे, युन्नूस पठाण, हर्षल धांडोरे, अनिकेत चंदनशिवे, अनिल कांबळे, विशाल कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Web Title: Indapur Congress's bombing movement