इंदापूरात हत्ती गवतापासून सीएनजी गॅस तयार होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:09 IST2021-05-15T04:09:47+5:302021-05-15T04:09:47+5:30
माळवाडी पंचक्रोशीतील शेतकरी व बाबासाहेब आजरेकर फडप्रमुख हरिदास बोराटे महाराज व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्र ...

इंदापूरात हत्ती गवतापासून सीएनजी गॅस तयार होणार
माळवाडी पंचक्रोशीतील शेतकरी व बाबासाहेब आजरेकर फडप्रमुख हरिदास बोराटे महाराज व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्र रेडके यांच्या हस्ते प्रकल्पाची सुरुरवात केली.
कंपनीचे कार्यकारी संचालक निखील ढोकरे म्हणाले की, तालुक्यातील शेतक-यांना या व्यवसायाचे सभासद करणार असून, प्रत्येक शेतकऱ्यास सेंद्रिय शेतीसाठी मदत करणार आहे. शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन हत्ती गवत खरेदी करणार असून बायो सीएनजी गॅस सीएनजी गॅस सेंद्रिय खतनिर्मिती करणार आहे. त्याच बरोबर प्रत्येक गावामध्ये एक ग्रामोद्योग नेमणार आहे.
लॉकडाऊनमुळे शेतकरी हैराण झाला आहे, अनेक शेतकऱ्यांच्या मुलांच्या हाताला रोजगार उपलब्ध नाही, त्यामुळे आम्ही विविध योजना राबवत असून, शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे.
यावेळी विष्णू घोगरे, निखिल पर्वते, संभाजी देवकर, अॅड. कुंडलिक मारकड, विशाल ढोकरे, सचिन चौरे, मंगेश नायकवडी, विनोद शिंदे, विजय कोकरे, राम गायकवाड, रमेश शिंदे आदी उपस्थित होते.