इंदापूरला दोन गटांत हाणामारी
By Admin | Updated: October 15, 2016 06:06 IST2016-10-15T06:06:39+5:302016-10-15T06:06:39+5:30
किरकोळ कारणावरून शुक्रवारी (दि. १४) सायंकाळी साडेसात ते रात्री पावणेआठच्या सुमारास शहरातील शेख मोहल्ला भागात किशोरवयीन

इंदापूरला दोन गटांत हाणामारी
इंदापूर : किरकोळ कारणावरून शुक्रवारी (दि. १४) सायंकाळी साडेसात ते रात्री पावणेआठच्या सुमारास शहरातील शेख मोहल्ला भागात किशोरवयीन मुलांच्या दोन गटांत हाणामारी होऊन सात ते आठ जण जखमी झाले आहेत.
तीन-चार वर्षांपासून मुलांच्या गटात कुरबुरी होत आहेत. मोहरमच्या दिवशी हा बाचाबाचीचा प्रकार घडला होता.
आज सायंकाळी एकाला कसला तरी मेसेज आला. त्या मेसेजमुळे झालेला वाद वाढत गेला. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. काठी, वीट, दगडांनी एकमेकांना मारहाण झाली.
यात ते जखमी झाले असून, जवळपास सात ते आठ जणांना उपजिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. (वार्ताहर)