शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

इंदापुरात माजी सैनिकाचा अर्धा एकर ऊस जाळला; दोघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 13:21 IST

माजी सैनिकाचा अर्धा एकर ऊस जाळून डाळिंबाची ८२ झाडे तोडली. विहीरीतील शेतीपंप व ठिबक संचांच्या फिल्टरची तोडफोड केल्याच्या आरोपावरुन कालठण नं. २ येथील दोघांवर सोमवारी (दि. २०) रात्री उशीरा इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्दे फिर्यादी हे इंदापूर अर्बन बँकेमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून पाहतात कामआरोपींपासून भविष्यात जीवितास धोका असल्याचे ही फिर्यादीमध्ये नमूद

इंदापूर : माजी सैनिकाचा अर्धा एकर ऊस जाळून डाळिंबाची ८२ झाडे तोडली. विहीरीतील शेतीपंप व ठिबक संचांच्या फिल्टरची तोडफोड केल्याच्या आरोपावरुन कालठण नं. २ येथील दोघांवर सोमवारी (दि. २०) रात्री उशीरा इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.शीलपुष्प भिकू भोसले, विशाल बाळासाहेब रेडके (दोघे रा. कालठण नं. २, ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहे. विजयकुमार घनश्याम चव्हाण (रा. कालठण नं.२) या माजी सैनिकाने त्यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे इंदापूर अर्बन बँकेमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम पाहतात. त्यांची कालठण नं. २ येथे जमीन गट क्र.४२/९ मध्ये दोन एकर जमीन आहे. त्यामध्ये अर्धा एकर ऊस व एक एकर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड केली आहे. रविवारी आपल्या भाचीच्या लग्नासाठी ते सहकुटुंब नाशिकला गेले होते. येथून परतत असताना रविवार मध्यरात्रीनंतर एक वाजण्याच्या सुमारास त्यांना त्यांच्या बांधकऱ्याचा फोन आला. त्याने फिर्यादीस ऊसाला आग लागल्याचे सांगितले. फिर्यादी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास शेतात पोहोचले. त्यावेळी त्यांच्या अर्ध्या एकर ऊसाला लागलेली आग ग्रामस्थ वाढवत असताना दिसले. डाळिंबाची ८२ झाडे तोडल्याचे, विहीरीतील शेतीपंप व ठिबक संचांच्या फिल्टरची तोडफोड केल्याचे पाहणीत आढळले. त्यावेळी माहिती घेताना वरील आरोपींनी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत हे नुकसान केल्याचे फिर्यादीस समजले. त्यानंतर त्यांच्या विरोधात फिर्याद देण्यात आली.

आरोपींपासून भविष्यात जीवितास धोका असल्याचे ही फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. इंदापूर पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेfireआग