शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूरला स्रेहसंमेलनात विद्यार्थ्यांमध्ये मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 02:03 IST

माध्यमिक विद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलनाच्या वेळी किरकोळ बाचाबाचीतून एका डोळ्याने अंध असणाºया युवकाच्या दुस-या डोळ्यावर लोखंडी फायटरने मारहाण करून त्याला गंभीर दुखापत करण्याचा प्रकार शेटफळ हवेली येथे रविवारी (दि. ३१) घडला.

इंदापूर - माध्यमिक विद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलनाच्या वेळी किरकोळ बाचाबाचीतून एका डोळ्याने अंध असणाºया युवकाच्या दुस-या डोळ्यावर लोखंडी फायटरने मारहाण करून त्याला गंभीर दुखापत करण्याचा प्रकार शेटफळ हवेली येथे रविवारी (दि. ३१) घडला.या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. पहिली तक्रार स्वप्निल बाळासाहेब करगळ (वय २२ वर्षे, रा.शेटफळ हवेली, ता. इंदापूर) याने केली आहे. त्या तक्रारीवरुन सुनील भरत नरबट, संदीप चव्हाण, संतोष दशरथ नरबट, विजय नरबट (सर्व रा.शेटफळ हवेली, ता. इंदापूर) व नाव पत्ता माहित नसलेल्या इतर पाच ते सहा अनोळखी लोकांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.दुसरी तक्रार भरत तायाप्पा नरबट (रा.शेटफळ हवेली,ता. इंदापूर) यांनी दिली आहे.त्यांच्या तक्रारीवरुन बाळासाहेब जिजाबा करगळ, पांडुरंग जिजाबा करगळ, हिरालाल पांडुरंग करगळ, नानासाहेब पांडुरंग करगळ, राजेंद्र रामचंद्र पांढरे (सर्व रा.शेटफळ हवेली, ता.इंदापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीसांनी सांगितले की, शेटफळ हवेली येथे बाळासाहेब करगळ यांच्या अधिपत्याखाली चालणा-या भैरवनाथ ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित माध्यमिक विद्यालयात रविवारी रात्री वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम सुरु होता. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मुलींच्या कपडे बदलण्याच्या खोलीजवळ उभा राहिलेला शाळेचा शिपाई सुरजित अशोक चव्हाण यास सुनील भरत नरबट, संदीप चव्हाण, संतोष दशरथ नरबट,विजय नरबट व इतर पाच ते सहा अनोळखी इसम शिवीगाळ दमदाटी करत होते. त्यांना स्वप्निल करगळ याने हटकले. त्यामुळे राग येवून सुनीलने स्वप्निलच्या उजव्या डोळ्यावर लोखंडी फायटरने मारले. इतरांनी स्वप्निल व शिपाई चव्हाण यांस लाथाबुक्यांनी मारहाण केली. स्वप्निलच्या गळ्यातील दोन तोळ्याचे सोन्याचे लॉकेट सीमकार्डसह फोन हिसकावून, स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उधळून आरोपी पळून गेले असे फिर्यादित म्हटले आहे. तर दि.१ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता बाळासाहेब जिजाबा करगळ,पांडुरंग जिजाबा करगळ, हिरालाल पांडुरंग करगळ, नानासाहेब पांडुरंग करगळ, राजेंद्र रामचंद्र पांढरे हे आरोपी आपल्या घरी आले. तुझ्या मुलाने शाळेवर भांडण केली आहेत. त्याला आम्ही जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देवून ते गेले. आपला मुलगा सुनील नरबट हा रविवारी रात्री साडेअकरा वाजलेपासून घरी आला नाही. त्यामुळे वरील आरोपींनी त्याचा खून करण्याच्या हेतूने त्याला पळवून नेले आहे, अशी तक्रार भरत नरबट यांनी दिली. त्यावरुन बाळासाहेब करगळ व इतरांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणे