इंदापूरला वाळूवाहतूक करणाऱ्यांवर कारवाई

By Admin | Updated: May 6, 2016 05:42 IST2016-05-06T05:42:24+5:302016-05-06T05:42:24+5:30

तहसीलदार वर्षा लांडगे यांनी गुरुवारी पुणे-सोलापूर महामार्गावर सरडेवाडी टोलनाक्याजवळ बेकायदेशीर वाळूवाहतूक करणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई करत १० वाहने ताब्यात घेतली.

In Indapur, the action taken against the sand carriers | इंदापूरला वाळूवाहतूक करणाऱ्यांवर कारवाई

इंदापूरला वाळूवाहतूक करणाऱ्यांवर कारवाई

इंदापूर : तहसीलदार वर्षा लांडगे यांनी गुरुवारी पुणे-सोलापूर महामार्गावर सरडेवाडी टोलनाक्याजवळ बेकायदेशीर वाळूवाहतूक करणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई करत १० वाहने ताब्यात घेतली.
दुपारी साडेचार वाजता सुरू केलेल्या या कारवाईत तहसीलदार लांडगे यांच्यासमवेत इंदापूरचे मंडलाधिकारी संतोष अनगरे,
तलाठी अजित पाटील, लाकडीचे तलाठी शड्याळ, नृसिंहपूरचे
तलाठी ए. व्ही. मुळे, काटीचे मंडलाधिकारी ता. भ. पवार, निरवांगीचे तलाठी एस. टी. यादव, लासुर्ण्याचे तलाठी सचिन करगळ, बावड्याचे मंडलाधिकारी रवी पारधे,पोलीस कर्मचारी गणेश पवार, विनोद नामदास, दत्तात्रय अर्जुन,संतोष लोंढे यांनी सहभाग घेतला.

अचानक झालेल्या या कारवाईमुळे बेकायदा वाळूउपसा करणाऱ्या, वाहतूक करणारांची त्रेधा उडाली. १० वाहनांवरील चालक इंजिन लॉक करून, टोलनाक्याच्या लेनमध्येच गाड्या सोडून पळून गेले. त्यामुळे वाहनांचा खोळंबा झाला.
वाळू वाहतूक करणाऱ्या अनेक वाहनांवर क्रमांक नव्हते. विनाक्रमांकाच्या गाड्या आरटीओ कार्यालयाच्या तावडीतून सुटून वाहतूक कशी काय करू शकतात, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या विभागाने कारवाई केली तर वाळू वाहतुकीस काही प्रमाणात आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: In Indapur, the action taken against the sand carriers