शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

इंदापुरात ३४ हजार ४०० पल्स पोलिओ लसीकरण

By admin | Updated: January 30, 2017 02:40 IST

इंदापूर तालुक्यामध्ये आज (दि. २९) प्लस पोलिओ लसीकरण अभियान यशस्वीपणे राबविले आहे. इंदापूर तालुक्यामध्ये ३६ हजार ५३७ बालके असून

लोणी देवकर : इंदापूर तालुक्यामध्ये आज (दि. २९) प्लस पोलिओ लसीकरण अभियान यशस्वीपणे राबविले आहे. इंदापूर तालुक्यामध्ये ३६ हजार ५३७ बालके असून १५०० कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यापैकी ३४ हजार ४०० बालकांना प्लस पोलिओ लसीकरण करण्यात आले. तालुक्यामध्ये टोलनाक्यावर ३ गट, रेल्वे स्टेशन १ गट, बस स्थानक २ गट तर वीटभट्टी व ऊसतोड मजूर यांच्या बालकांसाठी मोबाईल आणि स्ट्राजीस्ट गटाद्वारे प्लस पोलिओ लसीकरण मोहीम राबविली गेली. जी बालके पोलिओ लसीकरण करण्याचे राहिलेली आहेत, अशा बालकांना ‘तीव्र पल्स पोलिओ लसीकरण’अंतर्गत ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान बालकाच्या प्रत्यक्ष घरी जाऊन लसीकरण केले जाणार असल्याची माहिती तालुका विस्तार अधिकारी सुनील जगताप यांनी सांगितले.तालुक्यातील बिजवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हा विभाग सर्वांत मोठा आहे. या विभागांतर्गत परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, बस स्थानक, अशा ठिकाणी एकूण ८० बूथद्वारे १८२ कर्मचाऱ्यांनी प्लस पोलिओ लसीकरण मोहीम राबविली आहे. एकूण या विभागातील ७,८०० बालकांपैकी ७,५०० बालकांना लसीकरण करण्यात आले. प्लस पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी तालुका विस्तार अधिकारी सुनील जगताप, दिलीप जगताप, गट विकास अधिकारी माणिकराव बिचकुले, वैधकीय अधिकरी डॉ. सचिन तोरवे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत महाजन, आरोग्य सहायक होरणे, औषधनिर्माण अधिकारी प्रदीप गोलांडे, मयूरी लोहार, नितीन शिर्के, आरोग्य सहायक राजेंद्र डोळे यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)बारामतीत ५ हजार ७५० बालकांना पोलिओ डोसबारामती : पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेंतर्गत बारामती शहरात ५ हजार ७५० बालकांना, तर तालुक्यात ३५ हजार ६४४ बालकांना पोलिओ डोस देण्यात आला. शहरात ७ हजार २०५ बालकांना पोलिओ डोस देणे अपेक्षित होते. त्यापैकी ५ हजार ७५० बालकांना डोस देण्यात आला. त्यासाठी शहरात ४२ बुथ, २ मोबाईल पथक, ५ फिरते पथक कार्यरत होते. यामधील एकूण ५० कर्मचाऱ्यांनी पल्स पोलिओ मोहीम यशस्वी करण्यासाठी नियोजन केले. याशिवाय मंगळवार (दि. ३१) ते शनिवारी (दि. ४) पर्यंत घरोघरी जावून पोलिओ डोस पासून वंचित असणाऱ्या बालकांचा शोध घेणार आहे. वंचित बालकांना हा डोस देण्यात येणार आहे. त्यासाठी २५ पथकातील ५० कर्मचारी कार्यरत असल्याचे सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षका डॉ. मिरा चिंचोलीकर यांनी सांगितले. तर तालुक्यात ३४ हजार १४५ बालकांना डोस देणे अपेक्षित होते. मात्र, माळेगाव आणि सोमेश्वर कारखाना परिसरात ऊस तोडणी कामगारांच्या १ हजार बालकांची संख्या वाढली. त्यामुळे आज ३५ हजार ६४४ बालकांना पोलिओ डोस देण्यात आला. ग्रामीण भागात एकूण २८८ बुथ कार्यरत होते. टोलनाका, सुपे, बारामती बसस्थानक याशिवाय जिल्ह्याच्या सिमेवर कर्मचाऱ्यांचे पथक कार्यरत होते. मोरगाव परिसरात ३,९०९ बालकांचे लसीकरणमोरगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या ९ उपकेंद्रावर २१ गावांतील ३७ बूथवर ३,९०९ मुलांना पोलिओचा डोस पाजण्यात आला. यामध्ये अंगणवाडी महिलांसह ९१ व्यक्तींची नेमणूक केली असल्याचे वैद्यकीय अधिकारी अनिल वाघमारे यांनी सांगितले.मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत तरडोली, जळगाव, नारोळी, सुपा १, सुपा २, कोळोली, नारोळी, कारखेल येथे उपआरोग्य केंद्र आहेत. या अंतर्गत २१ गावे आहेत. पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, अंगणवाडी, मोरगाव बसस्थानक व गणपती मंदिर, सुपा बसस्थानक आदी भागात ०-५ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी पोलिओचा डोस पाजण्यासाठी बूथवर व्यवस्था केली होती. सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा डोस ३ हजार ९०९ मुलांना पाजण्यात आला. यासाठी केंद्राच्या वतीने आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा महिला, अंगणवाडी कार्यकर्त्या अशा ९१ कर्मचाऱ्यांना नियुक्त केले होते. तसेच आज परगावी गेलेल्या मुलांना अथवा चुकून पोलिओचा डोस न दिलेल्या वंचित मुलांना प्राथमिक आरोग्य केंद्र मोरगाव कडून घरोघरी जाऊन डोस देणार असल्याचे डॉ. वाघमारे यांनी सांगितले.