शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
3
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
4
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
5
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
6
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
7
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
8
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
9
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
10
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
11
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
12
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
13
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
14
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
15
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
16
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
17
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
18
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
19
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
20
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

इंदापूर : २२ गावांचा पाणीप्रश्न कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 02:26 IST

माण-खटाव तालुक्याची दुष्काळग्रस्त ओळख पुसण्याचा प्रयत्न श्रमदानातून होत आहे. त्याकामी उपस्थित राहून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केवळ एका तासात दुष्काळग्रस्त भागातील जलसंधारणाच्या कामांसाठी पाच कोटींचा निधी मिळवून दिला.

लाखेवाडी - माण-खटाव तालुक्याची दुष्काळग्रस्त ओळख पुसण्याचा प्रयत्न श्रमदानातून होत आहे. त्याकामी उपस्थित राहून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केवळ एका तासात दुष्काळग्रस्त भागातील जलसंधारणाच्या कामांसाठी पाच कोटींचा निधी मिळवून दिला. ही बाब लक्षात घेता, इंदापुरातील २२ गावच्या बारमाही प्रश्नाबाबत तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी आश्वासन दिले होते. परंतु, आज तब्बल २५ ते ३० वर्षे उलटल्यानंतर देखील या २२ गावातील पाणीप्रश्नाची अंमलबजावणी सणसर कटद्वारे झालेली नाही. त्यामुळे ‘पवार साहेब’ तुम्ही इंदापुरातील २२ गावांतही एकदा लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे.माण (सातारा) दौºयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार असताना त्यांनी वेळेत वेळ काढून वॉटर कप स्पर्धेच्या निमित्त तेथील दुष्काळग्रस्त गावांना भेटी दिल्या. शिवाय तेथील जलसंधारणाच्या कामासाठी पवार यांनी केवळ एका तासांमध्ये पाच कोटींचा निधी मिळवून दिला. जलसंधारणाच्या कामासाठी सरकारवर अवलंबून न राहता मदत करण्याची ग्वाही सुद्धा पवार यांनी दिली. याच पार्श्वभूमीवर पवार यांनी इंदापुरातील दुष्काळी गावांची पाहणी करावी, अशी अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे.लाखेवाडी, रेडा, रेडणी, काटी, वरकुटे, निमगाव केतकी, निमसाखर, निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी, घोरपडवाडी, गोतोंडी, खोरोची, चाकाटी, शिरसटवाडी, हगारवाडी, शेळगाव या गावांसह अन्य दक्षिण पट्ट्यातील गावांची दुष्काळी म्हणून ओळख कायम आहे. इंदापुरातील २२ गाव आजही पाण्यासाठी तहानलेली आहेत. विशेष म्हणजे याच बावीस गावच्या पाणी प्रश्नाबाबत मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी ही गावे पाणीदार करण्याचे, आश्वासन दिले होते. परंतु, आज तब्बल २५ वर्ष झाली तरी या २२ गावातील पाणी प्रश्न सुटलेला नाही. १९९५ मध्ये भाजप-शिवसेना युतीचे शासन सत्तेवर आल्यानंतरही याच मुद्याचे राजकारण केले गेले. पाणी प्रश्न सुटलाच नाही, पुन्हा सत्तेवर आल्यानंतर या गावांचा पाणी प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले गेले. सर्वच राजकीय पक्षांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे.इंदापुरातील या गावांना मुळच्या ‘जीआर’ प्रमाणे सणसर कटव्दारे ३.९ टीएमसी पाणी दरवर्षी मिळायला हवे. परंतु, पाणीच मिळत नसल्याने २२ गावांच्या हक्काचे पाणी कोठे जाते? याचे कोडे आजपर्यंत या गावातील ग्रामस्थांना उलगडलेले नाही. याच पाणी प्रश्नावर शेतकºयाला आत्महत्या करावी लागली. ज्येष्ठ नेते शरद पवार साताºयातील माण, खटाव तालुक्यात तासाभरात पाच कोंटींचा निधी देतात. तर काही संस्थांकडून देखील निधी उभारला. तसेच इंदापूर तालुक्यातील २२ गावांना भेट देवून पाणी प्रश्न मार्गी लावावा, अशी या भागातील शेतकरी करीत आहेत.केवळ टँकरने पाणी नको....- इंदापुरातील या २२ गावांतून एप्रिल, मे महिन्यांत टँकरची मागणी ठरलेली असते. यानुसार पिण्याच्या पाण्याचा पुरवठाही केला जातो. परंतु, केवळ टँकरचे पाणी देवून तहान भागवण्यापेक्षा पाण्याकरिता ठोस उपाय योजना करावी. शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी निकाली लावावा, अशी मागणी तालुक्याच्या दक्षिण पट्ट्यातील गावांतून होऊ लागली आहे.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीnewsबातम्या