इंदापूरला १२९ उमेदवार रिंगणात

By Admin | Updated: February 14, 2017 01:42 IST2017-02-14T01:42:16+5:302017-02-14T01:42:16+5:30

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या मुदतीत जिल्हा परिषदेच्या निवडणूकीतील

In Indapur, 129 candidates are in the fray | इंदापूरला १२९ उमेदवार रिंगणात

इंदापूरला १२९ उमेदवार रिंगणात

इंदापूर : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या मुदतीत जिल्हा परिषदेच्या निवडणूकीतील १०७ उमेदवारांपैकी ४७ तर पंचायत समिती निवडणूकीतील १२२ उमेदवारांपैकी ५३ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सात जागांसाठी ६० तर पंचायत समितीच्या चौदा जागांसाठी ६९ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.
गट व गणात मुख्य लढत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होतं आहे.राज्यात सत्तेवर असणा-या भाजप शिवसेनेने मोजक्याच जागांवर उमेदवार उभे केले.काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जास्त बंडखोरी झाली होती.
मात्र अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीत या दोन्ही पक्षांनी सर्व बंडोबा थंड करण्यात यश मिळवले. मात्र कळस वालचंदनगर गट (६),वालचंदनगर गण (८),पळसदेव बिजवडी गट (१०) अश्या प्रतिष्ठेच्या गटामध्ये उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळे मतविभागणीचा फटका बसेल असे चित्र आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर पै.अशोक चोरमले त्यांच्या पत्नी,संजय देवकर,प्रवीण बाबर, यांनी अपक्ष म्हणून जाहीर केलेली आणि बाळासाहेब व्यवहारे यांनी भाजप मधून जाहीर केलेली पत्नीची उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस समोरचे संकट टळले आहे. काँग्रेसमधील बंडखोर मंगेश डोंगरे यांनी उमादवारी मागे घेतली आहे. (वार्ताहर)

Web Title: In Indapur, 129 candidates are in the fray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.