शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘तेजस्विनी’कडे वाढतोय महिलांचा ओढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 20:35 IST

‘पीएमपी’च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी जागतिक महिला दिनापासून महिलांसाठी नवीन मिडी बसच्या माध्यमातून ‘तेजस्विनी’ ही बससेवा सुरू केली.

ठळक मुद्देमहिनाभरात सुमारे २ लाख ३ हजार महिला प्रवाशांना विशेष बससेवेतून प्रवास एकुण ८ मार्गांवर ३० बसेसमार्फत ही सेवा

पुणे : खास महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘तेजस्विनी’ या बससेवेकडे दिवसेंदिवस महिलांचा ओढा वाढत चालला आहे. मागील महिनाभरात दोन लाखांहून अधिक महिलांना या बसने प्रवास केला असून त्याद्वारे पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) २५ लाखांहून अधिक उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे आणखी काही मार्गांवर ही सेवा सुरू करण्याबाबत प्रशासनाकडून विचार केला जात आहे.‘पीएमपी’च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी जागतिक महिला दिनापासून महिलांसाठी नवीन मिडी बसच्या माध्यमातून ‘तेजस्विनी’ ही बससेवा सुरू केली. एकुण ८ मार्गांवर ३० बसेसमार्फत ही सेवा दिली जात आहे. यापुर्वी केवळ दोनच मार्गांवर ही सेवा सुरू होती. या बसेसच्याही मोजक्याच फेऱ्या होत होत्या. महिलांचा प्रतिसाद मिळत नसल्याने बस संख्या वाढविण्यात आली नव्हती. मात्र, तेजस्विनी सेवा सुरू झाल्यानंतर महिलांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. सध्या तेस्विनीच्या ८ मार्गांवर २१८ फेºया होत आहेत. बहुतेक सर्वच मार्गांवर महिलांचा ओढा या सेवेकडे वाढू लागला आहे.‘पीएमपी’ प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ८ मार्च ते ७ एप्रिल या महिनाभरात सुमारे २ लाख ३ हजार महिला प्रवाशांना विशेष बससेवेतून प्रवास केला आहे. त्यानुसार दैनंदिन सरासरी ६ हजार ७६६ महिला या बसने प्रवास करत आहेत. या माध्यमातून पीएमपीला दररोज सरासरी ८६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. दिवसागणिक यामध्ये वाढ होत असून महिलांकडून पसंती मिळू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून मार्ग वाढविण्याबरोबरच बसेसच्या संख्येत वाढ करण्याबाबत विचार सुरू असल्याचे समजते.------------दि. ८ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत मिळालेले उत्पन्न व प्रवासी संख्यासरासरी दैनंदिन उत्पन्न - तिकीट विक्री - ८३ हजार ५२६पास - २ हजार ३८४एकुण उत्पन्न - ८५ हजार ९१० सरासरी दैनंदिन प्रवासी - दैनंदिन तिकीटधारक - ६ हजार ७२८पास - ३८एकुण प्रवासी - ६ हजार ७६६------------------------------

मागील महिनाभरात महिला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच अन्य मार्गांवर बससेवा सुरू करण्याची मागणी आहे. त्यानुसार या सेवेचा मार्गनिहाय अभ्यास करून बस वाढविण्याबाबत निर्णय घेतला जाईल.- सुभाष गायकवाड, जनसंपर्क अधिकारीपीएमपी                

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडेWomenमहिला