होळी पार्ट्यांचे तरुणाईमध्ये वाढते फॅड
By Admin | Updated: March 7, 2015 00:15 IST2015-03-07T00:15:30+5:302015-03-07T00:15:30+5:30
शहर आणि परिसरात गेल्या काही वर्षांत होळीच्या पार्ट्यांचे फॅड वाढत असून, तरुणाईला आकर्षित करण्यासाठी शहरातील अनेक हॉटेल्स, लॉन्स आणि वॉटर पार्कमध्ये रेनी पार्ट्यांचे आयोजन करण्यात येत आहे.

होळी पार्ट्यांचे तरुणाईमध्ये वाढते फॅड
पुणे : शहर आणि परिसरात गेल्या काही वर्षांत होळीच्या पार्ट्यांचे फॅड वाढत असून, तरुणाईला आकर्षित करण्यासाठी शहरातील अनेक हॉटेल्स, लॉन्स आणि वॉटर पार्कमध्ये रेनी पार्ट्यांचे आयोजन करण्यात येत आहे.
शहरात सुमारे आठ आयोजकांनी होळीनिमित्त पार्टीसाठी जिल्हा करमणूक कर विभागाची परवानगी घेतली आहे.
गेल्या काही वर्षांत नववर्षाप्रमाणेच ख्रिसमस, व्हेलेन्टाईन डे, होळी अशा विविध कारणांसाठी पार्ट्यांचे आयोजन करण्याचे प्रमाण वाढले आहे. हॉटेल, लॉन्समध्ये छोट्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या पार्ट्यांना ग्लॅमरचे स्वरूप आले आहे. (प्रतिनिधी)
४गेल्या एक-दोन वर्षांपासून होळीनिमित्त रेनी पार्टी आयोजित करण्याचे प्रमाण वाढले आहे. हॉटेलबरोबरच लॉन्स, वॉटर पार्कमध्ये अशा प्रकारच्या पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते. यंदा शहर आणि परिसरातील सुमारे आठ आयोजकांनी अशा रेनी पार्ट्यांचे आयोजन केले.
४यामध्ये काही पार्ट्यांसाठी तिकीट लावले असले तरी काही केवळ प्रायोगिक स्वरुपाच्या असल्याचे जिल्हा करमणूक कर अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी सांगितले. शहरासह यंदा प्रथमच मुळशी आणि मावळ तालुक्यातदेखील रेनी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.