शहरावर वाढतोय स्थलांतरितांचा भार

By Admin | Updated: August 2, 2014 04:07 IST2014-08-02T04:07:02+5:302014-08-02T04:07:02+5:30

रोजगारासाठी येणाऱ्या स्थलांतरितांची संख्या प्रत्येक पाच वर्षांनी एकूण लोकसंख्येच्या १२ टक्के वाढत आहे

Increasing the burden of migrants growing on the city | शहरावर वाढतोय स्थलांतरितांचा भार

शहरावर वाढतोय स्थलांतरितांचा भार

पुणे : गेल्या दशकभरात वेगाने वाढणारे शहर आणि शहराच्या परिसरासत वाढणाऱ्या उद्योगांच्या संख्येमुळे शहरात रोजगारासाठी येणाऱ्या स्थलांतरितांची संख्या प्रत्येक पाच वर्षांनी एकूण लोकसंख्येच्या १२ टक्के वाढत आहे. त्यामुळे शहराच्या आर्थिक विकासात भर पडल असली तरी, या वाढत्या लोकसंख्येमुळे सार्वजनिक सुविधांवर ताण येण्याबरोबरच त्याचे पर्यावरण आणि झोपडपट्ट्यांची वाढही शहरात मोठ्या प्रमाणात झाली आहे. या शिवाय शहराच्या वाहतूक समस्येवरही गंभीर परिणाम होत आहे. महापालिकेच्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालातून ही बाब समोर आली आहे.
केंद्र शासनाने १९९0 च्या दशकात नवीन आर्थिक धोरण स्वीकारले. त्यामुळे शहराच्या परिसरात वेगाने बदल झाले. नवीन उद्योग, व्यवासाय, माहिती आणि तंत्रज्ञान कंपन्या
(आयटी) क्षेत्र, वाहन उद्योग, हॉटेल व्यवसाय, शहरात मोठ्या प्रमाणात वाढला. या वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शहरात मोठ्या प्रमाणत रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. परिणामी शहरात स्थलांतरितांची संख्या १९९0 नंतर झपाट्याने वाढल्याचे दिसून येते. यातील अनेक जण पुण्यातच स्थायिक झालेले आहेत. त्यामुळे कायमस्वरूपी वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांची लोकसंख्याही वाढत आहे.
१९८१ ते ९१ या दशकभरात शहरात स्थलांतर करणारी लोकसंख्या ३ लाख १0 हजार होती. मात्र, त्यानंतर आयटी क्षेत्राची वाढ वेगाने होऊ लागल्याने १९९१ ते २00१ या कालावधीत ही संख्या लोकसंख्येच्या तब्बल ३२ टक्के इतकी वाढली आहे. तर २00६ ते २0११ मध्ये एकूण लोकसंख्येच्या १२ टक्के वाढली
आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Increasing the burden of migrants growing on the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.