बाइकर्सची वाढली स्टंटबाजी

By Admin | Updated: October 28, 2015 01:23 IST2015-10-28T01:23:03+5:302015-10-28T01:23:03+5:30

कासारवाडीमध्ये बायकर्सच्या स्टंटबाजीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दिवसभर शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या सुमारास

Increased stunts of bikers | बाइकर्सची वाढली स्टंटबाजी

बाइकर्सची वाढली स्टंटबाजी

पिंपरी : कासारवाडीमध्ये बायकर्सच्या स्टंटबाजीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दिवसभर शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या सुमारास ही मुले ठरलेल्या परिसरात हमखास स्टंटबाजी
करतात. रेल्वेगेटखालील व वरील बाजूचा हा परिसर आहे. यामध्ये शास्त्रीनगर, जवळकर कॉलनी, जनसेवा चौक, हिराबाई झोपडपट्टी, गुलिस्ताननगरमध्ये गाड्या विचित्र पद्धतीने चालविण्याचे हे प्रकार
घडत आहेत.
गाड्यांना वेगळ्या प्रकारचे सायलेन्सर बसवलेले आहेत. त्यामुळे गाडीतून वेगवेगळ्या प्रकारचे आवाजही निघतात. ज्येष्ठ नागरिकही या प्रकाराने वैतागले आहेत. बाइक स्टंंट करणाऱ्यामधील काही मंडळी ही धनदांडग्या परिवारातील आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची गळचेपी होते. या उनाडक्या करणाऱ्या मुलांवर कारवाईचा बडगा उगारला जात नाही, असे काही नागरिकांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. या रस्त्यावर ज्येष्ठ
मंडळी जीव मुठीत घेऊन चालतात. दोन ते तीन महिन्यांपूर्वी दुचाकी
वेगाने चालविणाऱ्या एका
तरुणाला जीव गमावण्याची वेळ आली आहे. ही मुले भरधाव गाड्या चालवीत एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत चकरा मारत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
दरम्यान निगडी प्राधिकरणातही महाविद्यालयसमोर टवाळखोरांचा त्रास वाढला आहे. भरधाव वेगात गाड्या चालविणे तसेच महाविद्यालयाच्या समोर चकरा मारणे, युवतींना त्रास देणे असे प्रकार वाढले आहेत. या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त वाढवावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. परंतु पोलीस प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. टवाळखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी कडक कारवाईचे धोरण अवलंबवावे अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Increased stunts of bikers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.