शिरुर तालुक्यात दरवर्षी पालेभाज्या व कडधान्याची पिके घेतली जातात मात्र यंदा पावसाचे प्रमाण जास्त असल्याने पाण्याची उपलब्धता भरभरून असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड अधिक प्रमाणत केली आहे. ऊस पिक शेतकऱ्यांना आर्थिक समृध्द करणारे भरवशाचे पीक म्हणून पाहिले जाते. मात्र त्याच्या लागवडीपासून बांधणीपर्यंत बराच खर्चही आहे. त्याला रासायनिक खतांची मात्रा देण्यासाठी एकरी वीस हजारांपर्यंत खर्च येेतो. त्यामुळे अनेक शेतकरी हे सेंद्रिय शेतीकडे वळले आहे.
सर्वप्रथम शेतकरी मोकळ्या शेतात शेणखत व मेंढपाळ व्यवसायिक यांच्याकडून शेतात बकरी शेत खतवण्यासाठी बसवतात. त्यानंतर पिकाला जीवामृत, कोंबडी खत, लेंडी खत त्याचा योग्य वापर करून पिकाची वाढ केली जाते. कोंबड खत, मळी यांचाही वापर करून शेतकरी शेतातून एकरी १०० टनांपर्यंत उसाचे उत्पन्न घेत आहे. कोंबडी खताची स्लरी शेतीतील पिकाला लाभदायक असल्यामुळे पोल्ट्री मधून ही स्लरी शेतकऱ्यांना सहाहजार लिटरसाठी एक हजार रुपये एवढी अल्प किंमत देऊन शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलीजात असल्याची माहिती राजेंद्र थोरात यांनी दिली. शेतकरी स्लरी आपल्या शेतात सोडण्या कडे कल वाढलेला आहे. फक्त वाहतुकीचा खर्च जाता शेतकऱ्यांना ही स्लरी परवडणारी असल्यामुळे शेतकरी आपल्या शेतात स्लरी सोडून भरघोस उत्पन्न घेण्या वरती भर देत आहे.
--
०४ रांजणगाव सांडस : आलेगाव पागा ता शिरूर परिसरात कोंबड खताची स्लरी टँकर द्वारे पाण्यामध्ये मिक्स करून शेतात पिकाला दिली जात आहे.
--