ससेवाडी कोविड सेंटरमध्ये वाढीव रुग्णांची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:10 IST2021-04-20T04:10:28+5:302021-04-20T04:10:28+5:30
भागातील सौम्य लक्षण असलेले रुग्ण या ठिकाणी उपचार घेत आहेत. मात्र, भागातील कोरोनाचा वाढता प्रसार पाहता भोर तालुका माजी ...

ससेवाडी कोविड सेंटरमध्ये वाढीव रुग्णांची व्यवस्था
भागातील सौम्य लक्षण असलेले रुग्ण या ठिकाणी उपचार घेत आहेत. मात्र, भागातील कोरोनाचा वाढता प्रसार पाहता भोर तालुका माजी उपसभापती अमोल पांगारे यांनी या ठिकाणी वाढीव रुग्णांची व्यवस्था करावी, तसेच कोविड सेंटर मध्ये आपत्कालीन ऑक्सिजन बेडही उपलब्ध करून द्यावेत, यासंदर्भातची मागणी भोर तालुका प्रशासनाकडे केली होती.
याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे व भोर तालुका प्रांत अधिकारी राजेंद्र जाधव यांनी ससेवाडी येथील कोविड सेंटरला भेट देऊन कोविड सेंटरमधील व्यवस्थेची पाहणी केली. योग्य त्या सूचना प्रशासकीय कर्मचाऱ्यांना दिल्या त्याचबरोबर या ठिकाणी रुग्ण व्यवस्था वाढवता येईल का, याचीही माहिती घेतली. त्याचबरोबर येत्या काळामध्ये ऑक्सिजन बेडची काही व्यवस्था करता येऊ शकते का, याची चाचपणी त्यांनी केली. लवकरच यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल अशी माहिती त्यांनी या वेळी दिली
याप्रसंगी माजी उपसभापती अमोल पांगारे, भोर तालुका शिवसेना प्रमुख माऊली शिंदे ,ससेवाडी गावच्या सरपंच पूनम गोगावले,
शिंदेवाडीचे सरपंच अरविंद शिंदे ,प्रवीण शिंदे उमेश बोरकर उपस्थित होते.