शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाग्रस्तांवरील अंत्यविधीसाठी पुण्यात स्मशानभूमी वाढविल्या; शववाहिकाही असणार सेवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 20:13 IST

कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधीसाठी हेळसांड झाल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या.

ठळक मुद्देरुग्णालयांनुसार व्यवस्था : प्रत्येक स्मशानभूमीत शववाहिनीची सुविधापुण्यातील सर्व रुग्णालयांमधील डॉक्टरचा 'कोविड क्रिमेशन' हा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

पुणे : कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधीसाठी दोन दोन तास ताटकळत राहावे लागत असल्याची उदाहरणे समोर येत आहेत. त्यामुळे मृतदेह एका स्मशानभूमीतून दुसऱ्या स्मशानभूमीत हलविण्यास सांगण्याच्या आणि अंत्यविधीसाठी पैसे मागण्याच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे अंत्यविधींसाठी स्मशानभूमींची संख्या वाढविण्यात आली असून रुग्णालयांनुसार स्मशानभूमींची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक स्मशानभूमीसाठी शववाहिकाही तैनात करण्यात आली आहे.यापुर्वी कैलास आणि येरवडा स्मशानभूमीतच कोरोनाबाधित मृतांचे अंत्यसंस्कार केले जात होते. यापुढे या दोन स्मशानभूमींसह औंध, पाषाण, कात्रज, धनकवडी, मुंढवा, कोरेगाव पार्क, बिबवेवाडी स्मशानभूमीमध्येही अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. कैलास आणि येरवडा स्मशानभूमीमध्ये 24 तास अंत्यविधी केले जाऊ शकणार आहेत. तर, उर्वरीत स्मशानभूमींमध्ये सकाळी 8 ते रात्री 12 या वेळेतच अंत्यसंस्कार होणार आहेत. यासोबतच कोरोनाव्यतिरीक्त अन्य मृतांचेही अंत्यसंस्कार पुर्वीप्रमाणेच 24 तास सुरु राहणार आहेत.कैलास स्मशानभूमीत पुष्पकसह दोन शववाहिन्यांची व्यवस्था करण्यात आली असून ठरवून दिलेल्या रुग्णालयातील मृतदेह आणण्याची जबाबदारी चालकावर देण्यात आली आहे. मृतदेहासाठी रुग्णवाहिका बोलाविताना मृताचे नाव, डॉक्टरचे नाव व संपर्क क्रमांक देणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासोबतच शितशवपेटींचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

पुण्यातील सर्व रुग्णालयांमधील डॉक्टरचा कोविड क्रिमेशन हा व्हॉट्सअ‍ॅप ग्रृप करण्यात आला असून या गृपवर मृताची माहिती टाकण्यात येणार आहे. कागदपत्रांची पुर्तता करुन ऑनलाईन पद्धतीने मयत पास घेतल्यावर पुढील प्रक्रिया केली जाणार आहे. यासोबतच घरामध्ये मृत्यू झालेला असल्यास नातेवाईकांनी क्षेत्रीय वैद्यकीय अधिका-यांना माहिती देणे, ऑनलाईन पाससाठी अर्ज करणे, मयत पास घेऊन पुढील प्रक्रिया करणे बंधनकारक आहे.अधिकाऱ्यांनी नातेवाईकांना संपर्क करुन त्यांना पीपीई कीट व शव बॅग उपलब्ध करुन द्याव्यात. मृत व्यक्तीच्या घरासह आजुबाजुच्या परिसरात निर्जंतुकीकरण करणे, कोविडमुळेच मृत्यू झाला आहे का याची खात्री करणे अशा सूचना विद्यूत विभाग प्रमुख श्रीनिवास कंदूल यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका