राज्यात लसीकरण वाढविण्यासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:11 IST2021-04-11T04:11:05+5:302021-04-11T04:11:05+5:30
पुणे : गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत राज्यात उद्रेक होत आहे. त्यामुळे मायक्रोबायोलॉजी ...

राज्यात लसीकरण वाढविण्यासाठी
पुणे : गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत राज्यात उद्रेक होत आहे. त्यामुळे मायक्रोबायोलॉजी सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. अरविंद देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून लसीकरण वाढविण्याची विनंती केली आहे. लसीकरण हाच कोरोनाचा फैलाव रोखण्यावर चांगला उपाय असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
राज्यात आणि देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात तर विषाणूचे विविध स्टेन पाहायला मिळत आहेत. त्यामुळे लसीकरण वाढविणे हाच एक उपाय आहे. जर आताच लसीकरण तिप्पट-चौप्पट केले तर पुढील काही महिन्यांमध्ये वाढणारा उद्रेक कमी होऊ शकतो. त्यामुळे आताच त्याबाबत निर्णय घ्यायला हवा. त्यातूनच कोरोनाची साखळी तुटू शकते. येत्या ११ ते १४ एप्रिल दरम्यान लसीकरण महोत्सव जाहीर केला आहे. त्यातून देखील समाजात चांगला संदेश जाणार आहे, असेही डॅा. देशमुख यांनी पत्रात नमूद केले आहे.