मेथी, अंबाडी आणि राजगिऱ्याच्या दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:05 AM2021-02-22T04:05:24+5:302021-02-22T04:05:24+5:30

पुणे : मार्केटयार्डात रविवारी मेथी, अंबाडी आणि राजगिराºयांच्या दरात वाढ झाली असून, कोथिंबीर, शेपू, चाकवत, पुदीना, मुळे, चवळईच्या भावात ...

Increase in prices of fenugreek, flax and amber | मेथी, अंबाडी आणि राजगिऱ्याच्या दरात वाढ

मेथी, अंबाडी आणि राजगिऱ्याच्या दरात वाढ

Next

पुणे : मार्केटयार्डात रविवारी मेथी, अंबाडी आणि राजगिराºयांच्या दरात वाढ झाली असून, कोथिंबीर, शेपू, चाकवत, पुदीना, मुळे, चवळईच्या भावात घट झाली आहे. तर कांदापात, करडई, चुका, पालक आणि हरभरा गड्डीचे दर स्थिर होते़

मार्केटयार्डात कोथिंबिरीच्या सव्वा लाख जुड्यांची तर मेथीच्या ८० हजार जुड्यांची आवक झाली़ आवक वाढल्याने चवळईच्या भावात घाऊक बाजारात गड्डीमागे ५ रुपये, शेपू ३ रुपये, मुळे २ रुपये, चाकवत १ रुपये आणि पुदिनाच्या भावात जुडीमागे ५० पैशांनी घट झाली. तर राजगिरा जुडीमागे २ रुपये, मेथी आणि अंबाडी १ रुपयांनी महागली, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

---

पालेभाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :-

(शेकडा जुडी) कोथींबीर : ५०० - १२००, मेथी : २००-५००, शेपू : ६००-१०००, कांदापात : ८००-१०००, चाकवत : ४००-४००, करडई : ५००-६००, पुदीना १००-२००, अंबाडी ४००-६००, मुळे : ८००-१०००, राजगिरा : ३००-६००, चुका ३००-५००, चवळई : २००-३००, पालक : ४००-६००, हरभरा गड्डी : ४००-७००.

Web Title: Increase in prices of fenugreek, flax and amber

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.