लोखंडाच्या भावात वाढ
By Admin | Updated: November 14, 2016 03:11 IST2016-11-14T03:11:23+5:302016-11-14T03:11:23+5:30
लोखंडाच्या भावात वाढ

लोखंडाच्या भावात वाढ
पुणे : कच्चा मालाचे भाव वाढल्याने लोखंडाच्या भावात टनामागे ५०० ते १००० रुपयांची वाढ झाली आहे. चलनातून ५०० व १ हजार रुपयांच्या जुन्या नोटा रद्द झाल्याने कच्चा मालाची मागणी कमी झाली आहे. तर मागणीअभावी सिमेंट, वाळू,
वीट, खडी या बांधकाम साहित्याचे भाव आठवडाभर स्थिर राहिले.
मागणीअभावी लोखंड, वीट, खडी, वाळू, सिमेंट या बांधकाम साहित्याचे भाव मागील आठवडाभर स्थिर राहिले. बांधकाम साहित्याचे भाव : लोखंडाचे भाव (प्रति टन) : ६ एम.एम. ३५,०००, ८ एम.एम. ३६,५००, १० एम.एम. ३५,५००, १२ एम.एम. ३५,५००, १६ एम.एम. ३५,५००, २० एम.एम. ३५,५००, २५ एम.एम. ३५,५००. वीट (१ हजार) सहा इंची : ९५००, चार इंची ७०००, फ्लाय अॅश वीट (१ हजार) : सहा इंची ९०००, चार इंची ७०००, वाळू (१ ब्रास) : नदीची वाळू ९०००, खडीची वाळू ३३००, खडी : पाऊण इंची ३०००. सिमेंट : ४३ ग्रेड : ३०५-३१०, ५३ ग्रेड : ३१०-३१५. (प्रतिनिधी)