संग्राम घोडेकर यांच्या हल्ल्याप्रकरणी आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:10 IST2021-01-18T04:10:37+5:302021-01-18T04:10:37+5:30

गणेश ऊर्फ गणी (नाणेकर, रा .नाणेकरवाडी, चाकण), अजय ऊर्फ सोन्या राठोड, (वय २३, रा. १४ न. ता. जुन्नर), संदीप ...

Increase in police custody of accused in Sangram Ghodekar attack case | संग्राम घोडेकर यांच्या हल्ल्याप्रकरणी आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ

संग्राम घोडेकर यांच्या हल्ल्याप्रकरणी आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ

गणेश ऊर्फ गणी (नाणेकर, रा .नाणेकरवाडी, चाकण), अजय ऊर्फ सोन्या राठोड, (वय २३, रा. १४ न. ता. जुन्नर), संदीप बाळशीराम पवार (वय २०,रा. पिंपळवंडी ता. जुन्नर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांची पाच दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना शनिवारी जुन्नर न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. संग्राम घोडेकर याच्यावर ७ जानेवारी रोजी कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. या गुन्ह्यात चंद्रशेखर कोऱ्हाळे या मुख्य सूत्रधार सह दोन अल्पवयीन मुले आणि वरील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दुसरा सूत्रधार प्रशांत माने (रा. नारायणगाव) हा अद्याप फरार आहे. पोलिसांनी गुन्ह्यातील हत्यारे आणि हल्ल्याच्या वेळी वापरण्यात आलेली कपडे हस्तगत केली आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली.

Web Title: Increase in police custody of accused in Sangram Ghodekar attack case