शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कांदा, भेंडी, गवारच्या भावात वाढ

By admin | Updated: July 27, 2015 03:41 IST

पावसाने विश्रांती घेतल्याने रविवारी घाऊक बाजारात भाज्यांची मोठी आवक झाली. मात्र, काही भाज्या वगळता बहुतेक भाज्यांचे भाव उतरले.

पुणे : पावसाने विश्रांती घेतल्याने रविवारी घाऊक बाजारात भाज्यांची मोठी आवक झाली. मात्र, काही भाज्या वगळता बहुतेक भाज्यांचे भाव उतरले. कांदा. भेंडी, गवार, ढोबळी मिरची, तोंडली या फळभाज्यांचे भाव वाढले आहेत. तर पालेभाज्यांचे भाव स्थिर राहिले.गुलटेकडी येथील मार्केटयार्डात रविवारी १८० ते १९० ट्रक शेतमालाची आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत ही आवक १० गाड्यांनी वाढली. मागील आठवड्याच्या तुलनेत रविवारी कांद्याच्या भावात प्रति दहा किलोमागे ६० रुपयांनी वाढ झाली. परराज्यातून मागणी वाढल्याने कांद्याचे भाव सध्या तेजीत आहेत. गवार, भेंडी व ढोबळी मिरचीच्या भावात ४० ते ६० रुपयांनी तर तोंडल्याच्या भावात ९० रुपयांनी वाढ झाली. टोमॅटो, घेवडा व हिरवी मिरचीच्या भावात ४० ते ५० रुपयांनी घट झाली. भुईमुग शेंगला मागणी वाढल्याने भावात १०० रुपयांनी वाढ झाली. तर मटारची मुबलक आवक झाल्याने भाव ५०० रुपयांनी उतरले. पालेभाज्यांमध्ये आवक मुबलाक होत असल्याने बहुतेक भाज्यांचे भाव स्थिर राहिले. मागील आठवड्याच्या तुलनेत कोथिंबीर, चाकवत, करडई व चुका या भाज्यांचे भाव शेकडा जुडीमागे १०० रुपयांनी वाढले. तर मेथी, शेपू, अंबाडी व मुळ््याच्या भावात १०० रुपयांची घट झाली.रविवारी घाऊक बाजारात परराज्यातून बेळगाव, हुबळी, धारवाड येथून सुमारे १ हजार गोणी मटार, कर्नाटकातून ६ ते ७ ट्रक कोबी, इंदौर येथून ५ त ६ टेम्पो गाजर, कर्नाटक व मध्य प्रदेशातून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, आंध्रप्रदेश व तामिळनाडू येथून ४ ते ५ टेम्पो शेवगा, मध्य प्रदेशातून ३ ते ३.५ हजार गोणी लसणाची आवक झाली. तसेच गुजरात, आंध्रप्रदेश व इंदौर येथून ३० ते ४० ट्रक बटाट्याची आवक झाली. स्थानिक भागातून पारनेर येथून १५० गोणी मटार, ४ ते ५ टेम्पो हिरवी मिरची, ४५० गोणी सातारी आले, ५ ते ५.५ हजार पेटी टोमॅटो, १८ ते २० टेम्पो फ्लॉवर, १० ते १२ टेम्पो कोबी, १० ते १२ टेम्पो सिमला मिरची, २५० ते ३०० गोणी भुईमुग शेंग व ८ ते १० टेम्पो तांबडा भोपळ््याची आवक झाली.फळभाज्यांचे १० किलोचे दर :कांदा : २७०-३००, बटाटा ६०-११०, लसूण : ४००-८००, आले : सातारी : ३५०, बंगलोर २५०, भेंडी : १६०-२००, गवार : गावरान व सुरती २००-२५०, टोमॅटो : १००-१४०, दोडका : १६०-२५०, हिरवी मिरची : १६०-२५०, दुधी भोपळा : ४०-८०, चवळी :१००-१४०, काकडी : १२०-१८०, कारली : हिरवी : २००-२५०, पांढरी : १६०-१७०, पापडी : १००-१२०, पडवळ : २४०-२५०, फ्लॉवर : ५०-७०, कोबी : ८०-१२०, वांगी : ८०-१२०, डिंगरी : १२०-१४०, नवलकोल : १४०-१५०, ढोबळी मिरची : १८०-२२०, तोंडली : कळी : २४०-२५०, जाड : १००-११०, शेवगा : ३००-३५०, गाजर : १४०-१८०, वालवर : २००-२४०, बीट : १६०-२००, घेवडा : २००-३००, आर्वी : २००-२५०, घोसावळे : १६०-१८०, ढेमसे : १६०-१८०, भुईमुग शेंग ३५०-४५०, मटार : स्थानिक व परराज्य ५००-६००, पावटा : १६०-२००, तांबडा भोपळा : ४०-८०, चिंच : अखंड १३०-१४०, फोडलेली ४००-५००, नारळ : १०००-१२००, मका कणीस (शेकडा) : २००-३००. पालेभाज्यांचे शेकड्यातील दर : कोथिंबीर २००-६००, मेथी ४००-७००, शेपू २००-४००, कांदापात ८००-१२००, चाकवत ५००-६००, करडई ४००-५००, पुदिना ३००-४००, अंबाडी ३००-४००, मुळे ८००-१०००, राजगिरा ३००-४००, चुका ५००-६००, चवळई ३००-४००, पालक ३००-५००.