शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

एकपडदा चित्रपटगृहांना घरघर; शासनाची उदासिनता कायम, मल्टिप्लेक्समध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 13:06 IST

आशयघन, दर्जेदार कथानकामुळे गेल्या काही काळात मराठी चित्रपटांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. तरीही एकपडदा चित्रपटगृहांमध्ये हे चित्रपट चालले नसल्याने संक्रांत कायम आहे.

ठळक मुद्दे मल्टिप्लेक्समध्ये करमणूक क्षेत्रातील उद्योगसमूह गुंतवत आहेत पैसेप्रेक्षकवर्ग फिरकत नसल्याने एकपडदा चित्रपटगृहचालकांना परवडत नाही व्यवसाय

पुणे : आशयघन, दर्जेदार कथानकामुळे गेल्या काही काळात मराठी चित्रपटांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. फास्टर फेणे, दशक्रिया यांसारख्या चित्रपटांना अजूनही प्रेक्षकवर्गाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तरीही एकपडदा चित्रपटगृहांमध्ये हे चित्रपट चालले नसल्याने संक्रांत कायम आहे. प्रेक्षकवर्ग मराठी चित्रपट पाहण्यासाठीही मल्टिप्लेक्सला पसंती देत असल्याने चित्रपटांच्या ‘अच्छे दिन’चा एकपडदा चित्रपटगृहांच्या व्यवसायाला काहीच लाभ झालेला नाही. सध्याच्या मल्टिप्लेक्स संस्कृतीमध्ये एकपडदा चित्रपटगृहांसमोरील अडचणींचा डोंगर उभा राहिलेला आहे. मल्टिप्लेक्समध्ये करमणूक क्षेत्रातील उद्योगसमूह पैसे गुंतवत आहेत. त्यातुलनेत एकपडदा चित्रपटगृहचालकांकडे चित्रपटाच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी पैसे नाहीत, हे वास्तव आहे. प्रेक्षकवर्ग फिरकत नसल्याने एकपडदा चित्रपटगृहचालकांना हा व्यवसाय परवडत नाही. मात्र, शासनाच्या नियमानुसार, एकपडदा चित्रपटगृहचालकांनी दुस-या व्यवसायामध्ये प्रवेश करण्याचे ठरवल्यास त्यांना सध्याच्या तुलनेत एक तृतीयांश आसनव्यवस्थेचे चित्रपटगृह विकसित करावे लागते. जागा विकसित करण्यासाठी, वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक मिळावा, अशी मागणीही सिनेमा ओनर्स अँड एक्झिबिटर्स असोसिएशने शासनाकडे केली आहे.

५४ स्क्रीन वाढणार एकीकडे एकपडदा चित्रपटगृहे अनेक समस्यांचा सामना करत असताना दुसरीकडे मल्टिप्लेक्सची संख्या मात्र झपाट्याने वाढत आहे. शहराच्या विविध भागांमध्ये सध्या २३ मल्टिप्लेक्स असूून, ११६ स्क्रीनच्या माध्यमातून प्रेक्षक चित्रपटांचा आनंद लुटत आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात लवकररच दहा प्रस्तावित मल्टिप्लेक्सची भर पडत असून, त्याद्वारे ५४ स्क्रीन वाढणार आहेत.

विजय थिएटरचे दिलीप निकम म्हणाले, ‘गेल्या महिन्याभरात मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असला, तरी एकपडदा चित्रपटगृहांचा व्यवसाय वाढलेला नाही. अनेकदा चित्रपटगृहे रिकामी असल्याचेच चित्र पहायला मिळते. चांगल्या चित्रपटांमुळे आपल्या चित्रपटगृहांवर कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. इतर वेळच्या तुलनेत १० टक्केही लाभ झालेला नाही.’ चित्रपटगृहांच्या नुतनीकरणामध्ये अडचणी येतात. अनेक चित्रपटगृहांच्या इमारती जुन्या आणि मध्यवर्ती भागात आहेत. या जागा विकसित करण्यासाठी जागाच उपलब्ध नाही. एफएसआयचा अभाव, रहदारी, पार्किंगचा प्रश्न आदी समस्या आ वासून उभ्या आहेत. एकपडदा चित्रपटगृहांचे रुपांतर मल्टिप्लेक्समध्ये करायचे झाल्यास जागेची उपलब्धता ही मोठी अडचण ठरते. अनेकदा शासनाकडे अर्ज करुन, पालकमंत्र्यांची भेट घेऊनही दखल घेतली जात नसल्याने एकपडदा चित्रपटगृहमालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

  • गेल्या अनेक वर्षांमध्ये एकपडदा चित्रपटगृहांमध्ये ‘हाऊसफूल’चा बोर्ड लागलेला नाही. चांगला चित्रपट आला की प्रेक्षक मल्टिप्लेक्समध्ये जाऊन पाहतात. त्यामुळे एकपडदा चित्रपटगृहांकडे ते फिरकताना दिसत नाहीत. 
  • उत्तम आणि आरामदायी आसनव्यवस्था, चकचकीत आणि भव्य स्क्रीन, प्रेक्षकांना आल्हाददायक वाटणारी वातानुकूलित यंत्रणा यामुळे प्रेक्षक तिकडेच वळताना दिसतात. 
  • उत्पन्नाची मर्यादा कमी असल्याने एकपडदा चित्रपटगृहांमध्ये या सुविधा देणे शक्य होत नाही. 
  • सध्या पुण्यामध्ये १६ एकपडदा चित्रपटगृहे सुरु आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये १५ एकपडदा चित्रपटगृहे बंद पडली आहेत.
टॅग्स :entertainmentकरमणूकPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड