शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील गुन्हेसिद्धतेच्या प्रमाणात वाढ, वार्षिक अहवाल प्रकाशित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 04:37 IST

पुणे पोलीस प्रशासनाकडून गुन्हेगारी वार्षिक अहवाल प्रकाशित : २०१८ मध्ये गुन्हेसिद्धतेचे प्रमाण ३९.३५ टक्के

पुणे : शहरात गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यावर भर असून नागरिकांना केवळ आकडेवारीच्या माध्यमातून दिलासा न देता आता गुन्ह्याच्या पारंपरिक तपासपद्धतीपेक्षा माहिती व तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक ‘टेक्नोसॅव्ही’ होण्याकडे पुणे पोलीस प्रशासन लक्ष केंद्रीत करणार आहे. २०१७ च्या तुलनेत २०१८ च्या ‘कन्व्हिक्शन रेट’ (गुन्हासिद्धतेच्या प्रमाणात) ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याची एकूण टक्केवारी ३९.३५ इतकी आहे. यापुढील काळात शहरात शांतता व सुरक्षिततेबरोबरच गुन्हेगारी कमी करण्याकरिता पोलीस प्रशासनाकडून दोन टीमची निर्मिती करण्यात आली आहे. पोलिसांबरोबरच नागरिकांच्या सहभागाने गुन्हेगारीला आळा घालण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

शुक्रवारी पुणे शहराचे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी पुण्यातील वार्षिक गुन्हेगारीचा अहवाल सादर केला. यावेळी सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे उपस्थित होते. अहवाल प्रसिद्ध करताना शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण, गुन्हेसिद्धता आणि भविष्यकाळात प्रशासनाकडून उचलण्यात येणाऱ्या पावलांविषयी त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले, प्रॉसिक्युशन आणि इव्हेस्टिगेशन अशा दोन टीमची निर्मिती केली आहे. गुन्हेगारीतील काही मुद्द्यांचा बारकाईने अभ्यास केल्यास त्यात कौटुंबिक समस्या मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते. त्याकरिता महिला सहायक क्षेत्राचे कार्यक्षेत्र अधिक व्यापक करणार आहे. अधिकाºयांचे मनोबल, त्यांचा दृष्टिकोन व त्यांचे व्यक्तिमत्व विकास होण्याकरिता विविध कार्यक्रम हाती घेतले जाणार आहेत. पुढील काळात शहरात सीसीटीव्हीचे जाळे वाढविण्यावर भर असेल. नागरिकांना केवळ सांख्यिकीयदृष्ट्या गुन्हेगारी कमी झाली, असे सांगण्यापेक्षा त्यांचा पोलीस प्रशासनात भावनात्मकदृष्या सहभाग कशा पद्धतीने वाढेल, याकडे लक्ष देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पुणे पोलिसांनी मागील दोन वर्षांत 273 गुडांवर तडीपारीची कारवाई केली होती. यातील तब्बल 200 गुन्हेगार पुन्हा शहराच्या हद्दीत आढळले. यामुळे तडीपारीच्या कारवाईनंतर संबंधीत गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यास पोलीस कमी पडत असल्याचे दिसत आहे. काही तडीगार गुंडांनी तडीपारीच्या आदेशाचा भंग करत गुन्हे ही केले आहे.पुणे पोलीस प्रशासन : २०१८ च्या वार्षिक अहवालातील महत्त्वाचे मुद्देखून, खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध, हयगयीने मृत्यू आणि नवविवाहित अशा भाग १ ते भाग ५ पर्यंतमध्ये मागील वर्षभरात केलेल्या तपासअंती समोर आलेले नित्क र्ष म्हणजे या गुन्ह्यांमधील ‘कन्व्हिक्शन रेट’ २०१८ मध्ये ६६.७५ टक्के इतका आहे. याच वर्षी खुनाचे ७२ गुन्हे दाखल झाले असून त्यातील ७१ गुन्हे उघड झाले आहेत. मागील दहा वर्षे खुनाप्रकरणातीलदोषींना शिक्षेचे प्रमाण ९४ टक्के होते. २०१८ मध्ये त्याची टक्केवारी ९९ टक्के इतकी आहे. चोरीच्या प्रकरणातीलगुन्हा उघडकीचे प्रमाण देखील ८२ टक्के इतके आहे. एकूण मालमत्तेचे ४५२४ गुन्हे दाखल करण्यात आले यापैकी १७६९ उघड झाले.2सायबर गुन्ह्यातदेखील पोलिसांनी एकूण १७५ गुन्हे दाखल केले. त्यात १०० आरोपी पकडण्यात आले. तर प्रशासनाकडे ११ लाख ५१ हजार ६०० रुपयांची रक्कम जमा झाली. तर २४० बिटकॉईन, ९१ इथेरियम जमा झाले. २०१७ मध्ये सायबरचे गुन्ह्यात २१४ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यापैकी ९० आरोपींना अटक करण्यात आली. गुन्ह्यांमधून जमा करण्यात आलेली रक्कम ६ कोटी ७९ लाख १६ हजार ४७६ एवढी होती.3शहरात मागील दोन वर्षांत व्हीआयपी व्यक्तींच्या दौºयात मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. २०१७ मध्ये १०८६ तर २०१८ मध्ये १७१५ व्हीआयपी दौºयांची नोंद करण्यात आली आहे. २०१४ (४४५), २०१५ (६०५), २०१६ (६४८) याप्रमाणे व्हीआयपी दौरे पार पडले. शहरात वाहतूक व सुरक्षेच्या दृष्टीने बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून १०१ गुन्हे दाखल करण्यात आले, त्यातून ३४२ आरोपींना अटक करण्यात आले असून त्यातून ७४ लाख ९४ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तर २०१७ मध्ये उघडकीस आलेले गुन्हे १०९, अटक आरोपी १४९ तर २१ लाख ७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.२०१८ मधील गंभीर गुन्ह्यांची आकडेवारी; कंसात उघडकीस गुन्हेखून ७२ (७१), खुनाचा प्रयत्न १२८ (१२८), सदोष मनुष्यवध ५ (५), हयगयीने मृत्यू २६७ (२१५), नवविवाहिता १९ (१९), दरोडा २७(२६), दरोड्याची तयारी १७(१७), जबरी चोरी ३३६(२२७), चेन चोरी १०५(७६), इतर जबरी चोरी २३१(२०१), दिवसा घरफोडी १३६(६१), रात्री घरफोडी ४६४(२११), सर्व प्रकारची चोरी (३५४ (११७७), सायकल चोरी ४७ (१५), वाहनचोरी १९६६(५७६), वाहन पार्ट चोरी ९(३), पॉकेट चोरी १६(६), विश्वासघात ८१(७१), फसवणूक ६९५(५८०), दंगा २३२(२२८), बलात्कार २३६(२३६), विनयभंग ५०९ (५०९), अमली पदार्थ ७६(७६), जुगार ३१७ (३१७)वर्ष आणि गुन्हेशाबितीचे (गुन्हेसिद्धताव गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण)२०१२ (१९.२३ %), २०१ (१३.३३ %),२०१४ (९.८८ %), २०१५ (१५.८९%),२०१६ (३६.३१%), २०१७ (२९.७६%),२०१८(३९.३५)

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी