बारामती आगाराच्या उत्पन्नात वाढ
By Admin | Updated: June 17, 2015 22:48 IST2015-06-17T22:48:52+5:302015-06-17T22:48:52+5:30
बारामती आगाराला मे अखेर ४ कोटी ३९ लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. मात्र दुचाकी वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने आगाराच्या ‘शटल’ सेवेवर
बारामती आगाराच्या उत्पन्नात वाढ
बारामती : बारामती आगाराला मे अखेर ४ कोटी ३९ लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. मात्र दुचाकी वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने आगाराच्या ‘शटल’ सेवेवर परिणाम झाला आहे. स्थानिक प्रवाशी संख्या त्यामुळे घटली आहे. मात्र लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून आगारास चांगले उत्पन्न मिळत आहे.
मागील काही वर्षांपासून दुचाकी वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे सहाजीकच ३० किलोमिटरच्या प्रवासासाठी प्रवाशांकडून दुचाकी वाहनांचा वापर होतो. त्यामुळे ‘लोकल’ प्रवासी संख्या घटली आहे. मात्र विद्यार्थी, कामगार यांना या शटल सेवांचा चांगला लाभ मिळत आहे. बारामती आगारातून महाराष्ट्र आणि राज्याबाहेर धावणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाड्यांची प्रवाशी संख्या जास्त आहे. त्यांमुळे या लांबपल्ल्याच्या गाड्यांमधून आगाराला चांगला फायदा मिळत आहे.
लांब पल्ल्याच्या १६ गाड्या आगारातून रोज धावत आहेत. तर पुणे विनाथांबा गाड्यांच्या दररोज ५० ते ५८ फेऱ्या होत आहेत. बारामती आगाराच्या बसगाड्यांचा वर्षभरात १५ लाख ८८ हजार किलोमिटर एवढा प्रवास झालेला आहे. दररोज बारामती आगाराच्या गाड्यांमधून ६० ते ६५ हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. त्यामानाने आगाराकडे असणारे मनुष्यबळ कमी आहे.
२३७ चालक आणि २०७ वाहकांच्या माध्यमातून आगार प्रवाशांना सेवा देत आहे. त्यामुळे प्रवाशी संख्यालक्षात घेता आगारात आणखी नव्या गाड्यांची आणि कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, असे आगार प्रमुख रमाकांत गायकवाड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)