शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात गुन्हेगारीत वाढ! वेळ मागूनही मुख्यमंत्री वेळ देत नाहीत, सुप्रिया सुळेंची तक्रार

By राजू इनामदार | Updated: March 3, 2025 17:08 IST

सरकारी माहितीच सांगते की, राज्यातील गुन्हेगारीत, त्यातही महिलांवरील अत्याचारात मागील काही महिन्यांमध्ये वाढ झालीये

पुणे: सरकारी माहितीच सांगते आहे. की राज्यातील गुन्हेगारीत, त्यातही महिलांवरील अत्याचारात मागील काही महिन्यांमध्ये वाढ झाली आहे. या व अन्य गोष्टींबाबत चर्चा करण्यासाठी वेळ मागूनही मुख्यमंत्री वेळ द्यायला तयार नाहीत अशी तक्रार खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. लाडकी बहिण योजना राबवणाऱ्यांकडूनच बहिणींचा अवमान करणारे वक्तव्य येत आहे असे त्या म्हणाल्या.

खासदार सुळे यांनी सोमवारी सकाळी स्वारगेट बस स्थानकाला भेट दिली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, रविंद्र माळगावकर व अन्य पदाधिकारी त्यांच्यासमवेत होते. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर खासदार सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, बलात्कार प्रकरणाचा निषेधच आहे, पण घटना घडल्यावर ज्यापद्धतीने ती हाताळली गेली ते चुकीचे आहे. प्रकरण दडपण्याचा पोलिसांचा प्रयत्न दिसून येतो. घटनेनंतर आलेल्या प्रतिक्रियाही असंवेदनशील होत्या. आता आरोपी अटकेत आहे. जलदगती न्यायालयात खटला चालवून पिडितेला न्याय दिला पाहिजे. आरोपीला कठोर शिक्षा झाल्यावरच ते होईल.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या पीएस ओएसडीना जो चाप लावला तोच चाप मंत्र्यांनाही लावला पाहिजे असे खासदार सुळे म्हणाल्या. बीड जिल्ह्याची बदनामी दोन चार लोकांमुळे होत आहे. राज्यात नव्हे तर देशात बदनामी होत आहे. संशयित आरोपींना व्हिआयपी ट्रीटमेंटच्या बातम्या मी बघितल्या आहेत, मात्र एक खून माफ आहे सारखे सुरू आहे. यालाच आळा बसावा म्हणून मी मुख्यमंत्र्यांची भेट मागत आहे, मात्र ते वेळ देत नाहीत असे त्यांनी सांगितले.

क्रुषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि विविध प्रकारचे आरोप होत असलेले धनंजय मुंडे यांचा राजीनामा  घ्यायचा की नाही तो प्रश्न त्यांच्या पक्षाचा आहे, मात्र सुनील केदार यांच्यावर आरोप झाले तेव्हा त्यांनी राजीनामा  दिला. मग सुनील केदार यांना एक न्याय आणि माणिकराव कोकाटे यांना वेगळा न्याय कसा? असा प्रश्न सुळे यांनी केला.

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेPoliticsराजकारणswargate bus depotस्वारगेट बसस्थानकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसCrime Newsगुन्हेगारी