खाद्यतेल, साबुदाणा, साखरेच्या भावात वाढ
By Admin | Updated: December 7, 2015 00:23 IST2015-12-07T00:23:24+5:302015-12-07T00:23:24+5:30
मार्केटयार्डातील भुसार बाजारात आठवडाभरात खाद्यतेल, साबुदाणा व साखरेच्या भावात वाढ झाली. मागणीअभावी इतर वस्तूंचे भाव स्थिर राहिले.

खाद्यतेल, साबुदाणा, साखरेच्या भावात वाढ
पुणे : मार्केटयार्डातील भुसार बाजारात आठवडाभरात खाद्यतेल, साबुदाणा व साखरेच्या भावात वाढ झाली. मागणीअभावी इतर वस्तूंचे भाव स्थिर राहिले.
आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलांचे भाव वाढले आहेत. तसेच डॉलरची किंमत वाढल्याने त्याचा परिणाम स्थानिक बाजारातही जाणवू लागला आहे. शेंगदाणा, रिफाइंड, सूर्यफूल, पामतेल, सोयाबीन तेलामध्ये १५ ते २० रुपयांची वाढ झाली आहे. साखरेच्या भावातही क्विंटलमागे ५० रुपयांची वाढ झाली. चेन्नईत झालेल्या पावसामुळे साबुदाण्याची आवक घटली आहे. परिणामी क्ंिवटलमागे ३०० ते ४०० रुपयांची वाढ झाली. नवीन ११२१, १५०९ व कोलम लचकारी तांदळाची आवक सुरू झाली असून, भाव स्थिर राहिले. डाळींचे भावही तेजीत आहेत. शेंगदाण्याची निर्यात वाढल्याने गुजरात जाडा शेंगदाण्याच्या भावात आठवडाभरात २०० रुपयांची वाढ झाली. नवीन ब्याडगी व आंध्र प्रदेशातून गुंटूर मिरचीची आवक सुरू झाली आहे.
क्विंटलचे भाव : गहू : सौराष्ट्र लोकवन २५५०-३०५०, मध्य प्रदेश लोकवन २४५०-२७५०, सिहोर ३२५०-३८५०, मिलबर १८००-१८५०, ज्वारी : गावरान २९००-३५००, दुरी १९००-२१००, बाजरी महिको १८००-२०००, गावरान १६००-१८००, हायब्रीड १५००-१६००.
डाळी : (प्रतिक्विंटल) : तूरडाळ- १२,००० -१७,०००, हरभरा डाळ- ६०००-६५००, मूगडाळ- १०,०००-१०,३००, मसूर डाळ- ७०००-७३००, मटकी डाळ -९८००-९९००, उडीद डाळ- १५,०००-१५,५००़
कडधान्ये : हरभरा: ५८००-६०००, हुलगा: ३०००-३२००, चवळी: ५०००-६५००, मसूर: ६२००-६५००, मटकी: ७०००-९०००, वाटाणा : पांढरा २७००-२८००, हिरवा: २७००-३५००.