कोविड लसीकरणात नागरिकांचा सहभाग वाढवा : जिल्हाधिकारी देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:11 IST2021-04-06T04:11:19+5:302021-04-06T04:11:19+5:30

शेलपिपळगाव (ता. खेड) येथील प्राथमिक ग्रामीण आरोग्य केंद्रात सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपविभागीय अधिकारी ...

Increase citizen participation in covid vaccination: Collector Deshmukh | कोविड लसीकरणात नागरिकांचा सहभाग वाढवा : जिल्हाधिकारी देशमुख

कोविड लसीकरणात नागरिकांचा सहभाग वाढवा : जिल्हाधिकारी देशमुख

शेलपिपळगाव (ता. खेड) येथील प्राथमिक ग्रामीण आरोग्य केंद्रात सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण व पुणे जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट देऊन पाहणी केली.

याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे, सरपंच विद्या मोहिते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सयाजीराजे मोहिते, डाॅ बळीराम गाढवे, ग्रामपंचायत सदस्य सदस्य संदिप मोहिते, केशव आरगडे, मंडलाधिकारी विजय घुगे, संजय मोहिते, ग्रामविकास अधिकारी उत्तम कांबळे, तलाठी राहूल पाटील, वैशाली झेंडे, सतिश शेळके, स्वराज मोहिते,एकनाथ पारधी, ज्ञानेश्वर आढाव, अमित शेखरे, माणिक चव्हाण, ज्योती रणदिवे आदी उपस्थित होते.

दरम्यान शेलपिंपळगाव आरोग्य केंद्रात आजअखेर ६० वर्षे वयावरील एकूण दोन हजार १२९ व ४५ ते ६० वयातील एक हजार ३३७ तर इतर ७१४ अशा एकुण चार हजार १८० जणांना कोविड लसीकरण करण्यात आले आहे. दवाखान्यातील स्वच्छतेविषयी जिल्हाधिकारी डॉ देशमुख यांनी समाधान व्यक्त केले.

फोटो ओळ : शेलपिपळगाव (ता. खेड) येथील आरोग्य केंद्राला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भेट दिली.

(छाया : भानुदास पऱ्हाड)

Web Title: Increase citizen participation in covid vaccination: Collector Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.