रविवारी ७७४ कोरोनाबाधितांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:12 IST2021-03-01T04:12:12+5:302021-03-01T04:12:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील कोरोनावाढीतांची संख्या रविवारीही कायम असून, आज दिवसभरात ७७४ नवे कोरोनाबाधित आढळून आले ...

An increase of 774 corona sufferers on Sunday | रविवारी ७७४ कोरोनाबाधितांची वाढ

रविवारी ७७४ कोरोनाबाधितांची वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरातील कोरोनावाढीतांची संख्या रविवारीही कायम असून, आज दिवसभरात ७७४ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ आज विविध प्रयोगशाळांमध्ये ७ हजार ४७३ तपासण्या करण्यात आल्या. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी १०.३५ टक्के आहे़

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार : सायंकाळी साडेचारपर्यंत शहरातील विविध रुग्णालयांत ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या ५४५ इतकी असून, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही २६१ इतकी आहे़ तर आज दिवसभरात ४२७ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले असून, शहरातील सक्रिय रुग्णसंख्या ४ हजार ९१९ इतकी झाली आहे़

शहरात आजपर्यंत ११ लाख ४३ हजार ८४६ हजार जणांची कोरोना तपासणी केली असून, यापैकी २ लाख २ हजार ७०२ जण कोरोनाबाधित आढळले. यापैकी १ लाख ९२ हजार ९२८ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात ४ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २ जण पुण्याबाहेरील आहेत़ आजपर्यंत शहरात कोरोनामुळे ४ हजार ८५५ जणांचा मृत्यू झाला आहे़

--------------------------

Web Title: An increase of 774 corona sufferers on Sunday