रविवारी ४८६ कोरोनाबाधितांची वाढ : ८८७ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:08 IST2021-05-31T04:08:25+5:302021-05-31T04:08:25+5:30

पुणे : शहरात रविवारी कोरोनाबाधितांची वाढ ही पुन्हा एकदा पाचशेच्या आत आली असून, आज दिवसभरात केवळ ४८६ कोरोनाबाधित आढळून ...

Increase of 486 corona victims on Sunday: 887 corona free | रविवारी ४८६ कोरोनाबाधितांची वाढ : ८८७ कोरोनामुक्त

रविवारी ४८६ कोरोनाबाधितांची वाढ : ८८७ कोरोनामुक्त

पुणे : शहरात रविवारी कोरोनाबाधितांची वाढ ही पुन्हा एकदा पाचशेच्या आत आली असून, आज दिवसभरात केवळ ४८६ कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ दरम्यान महापालिकेसह खासगी प्रयोगशाळांमधील तपासण्यांचे प्रमाणही दिवसागणिक कमी होऊ लागली असून, आज झालेल्या ७ हजार ४२३ तपासण्यांमध्ये एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची टक्केवारीही ६़ ५४ टक्के इतकी खाली आली आहे़

शहरातील सक्रिय रुग्णसंख्या ६ हजार ६१५ असून, रविवारी ८८७ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ दिवसभरात ३७ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ९ जण हे पुण्याबाहेरील आहे़ शहरातील आजचा मृत्यू दर हा १़ ७५ टक्के इतका आहे़

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये १ हजार ६२३ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू असून, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही ९५४ इतकी आहे़ शहरात आत्तापर्यंत २४ लाख ९२ हजार २९८ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ६९ हजार ७४७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ तर यापैकी ४ लाख ५४ हजार ९०० जण कोरोनामुक्त झाले आहेत़ तर आतापर्यंत शहरात ८ हजार २३२ जणांचा मृत्यू झाला आहे़

-----------

Web Title: Increase of 486 corona victims on Sunday: 887 corona free