दिवसभरात ४१४ रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:19 IST2021-02-21T04:19:09+5:302021-02-21T04:19:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये शनिवारी दिवसभरात ४१४ रुग्णांची वाढ झाली. तर, बरे झालेल्या २४७ रुग्णांना ...

An increase of 414 patients in a day | दिवसभरात ४१४ रुग्णांची वाढ

दिवसभरात ४१४ रुग्णांची वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये शनिवारी दिवसभरात ४१४ रुग्णांची वाढ झाली. तर, बरे झालेल्या २४७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील १६० रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या २ हजार ५६१ झाली आहे.

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १६० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ३४५ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ५ मृतांची नोंद करण्यात आली आहे. पुण्याबाहेरील एका मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ८२१ झाली आहे.

दिवसभरात एकूण २४७ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ८९ हजार ९४८ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ९७ हजार ३३० झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या २ हजार ५७१ झाली आहे.

-------------

दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ४ हजार ६३४ नागरिकांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १० लाख ९४ हजार ४२७ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

Web Title: An increase of 414 patients in a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.