शुक्रवारी ४०६ कोरोनाबाधितांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:08 IST2020-11-28T04:08:26+5:302020-11-28T04:08:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात शुक्रवारी ४ हजार ७७७ कोरोना संशयित रूग्णांची तपासणी करण्यात आली असून, यामध्ये ४०६ ...

An increase of 406 corona sufferers on Friday | शुक्रवारी ४०६ कोरोनाबाधितांची वाढ

शुक्रवारी ४०६ कोरोनाबाधितांची वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरात शुक्रवारी ४ हजार ७७७ कोरोना संशयित रूग्णांची तपासणी करण्यात आली असून, यामध्ये ४०६ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे़ एकूण तपासणीच्या तुलनेत आजची कोरोनाबाधित रूग्णांची टक्केवारी ही साडेआठ टक्के इतकी आहे़

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी पाचपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये ४१३ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, यापैकी २४९ जण व्हेंटिलेटरवर आहेत़ तर १ हजार १२४ जणांवर आॅक्सिजनसह उपचार सुरू आहेत़ शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ५ हजार ४०१ इतकी आहे़ आज दिवसभरात ३२० जण कोरोनामुक्त झाले असून, ३ जणांचा मृत्यू झाला आहेत़ यातील एक जण पुण्याबाहेरील आहे़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ४५१ इतकी झाली आहे़ आजपर्यंत ८ लाख ८ हजार ६४८ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ६८ हजार ८६६ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ यापैकी १ लाख ५९ हजार १४ जण कोरोनामुक्त झाले आहेत़

======================

Web Title: An increase of 406 corona sufferers on Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.