गुरुवारी ३८७ कोरोनाबधितांनाची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:27 IST2021-01-08T04:27:33+5:302021-01-08T04:27:33+5:30

पुणे : शहरात गुरुवारी ३८७ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ३९३ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात ५ हजार ४३ ...

An increase of 387 corona victims on Thursday | गुरुवारी ३८७ कोरोनाबधितांनाची वाढ

गुरुवारी ३८७ कोरोनाबधितांनाची वाढ

पुणे : शहरात गुरुवारी ३८७ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ३९३ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात ५ हजार ४३ संशयितांची तपासणी करण्यात आली़ तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ७़ ६ टक्के इतकी आहे़

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारपर्यंत शहरातील विविध रुग्णालयांमध्ये २०२ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू असून, आॅक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २८८ इतकी आहे़

शहरातील सक्रिय रुग्ण संख्या २ हजार ६७८ इतकी आहेत़ आज दिवसभरात ४ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १ जण पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ६६३ इतकी झाली आहे़

शहरात आजपर्यंत ९ लाख ४६ हजार १७ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ८० हजार ६७४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ यापैकी १ लाख ७३ हजार ३३३ जण कोरोनामुक्त झाले आहेत़

==========================

Web Title: An increase of 387 corona victims on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.